ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, ही प्रक्रिया ३१ मे रोजीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, यंदा ही प्रक्रिया लांबली. आता १६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना बदली प्रक्रियेला आता कुठे गती आली आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषद शिक्षकांनी बदली पोर्टलवर आपले 'प्रोफाइल' अद्ययावत केले.
आता त्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. संवर्ग एकमध्ये प्रामुख्याने दिव्यांग शिक्षक, गंभीर आजाराने ग्रस्त
असलेले शिक्षक, तसेच वयाची ५३ वर्षे उलटलेल्या शिक्षकांचा समावेश होतो.
ॲजिओप्लाॕस्टी संदर्भात राज्यात विषमता
नुकतेच सांगली जिल्हा परिषदेने संवर्ग १ अंतर्गत वंचित राहिलेल्या ॲजिओप्लाॕस्टी झालेल्या शिक्षकांना विशेष प्रक्रिया राबवित बदली होण्यासाठी आदेश निर्गमीत केलेले असतांना मात्र मराठवाडयातील अनेक जिल्ह्यात ॲजिओप्लाॕस्टीला संवर्ग १ पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. याबाबतीत अनेकदा ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा करूनही एक राज्य एक बदली धोरण असतांना ही झालेली विषमता गंभीर म्हणावी लागेल. व ॲजिओप्लाॕस्टी झालेल्या शिक्षकांकडून तीव्र निषेध याबाबतीत होत आहे.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.. आई व वडील दोन्हीही आयुष्यात सारखेच महत्त्वाचे आहेत स्त्री पुरुष समानता संविधानानं आपल्या देशात आहे. ज्याची पत्नी देवाघरी ती विधुर व्यक्ती ही सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय असते,एकच पालक पण लेकरांचे मायबाप दोन्ही भूमिका सांभाळत असते. "पती पत्नी एकत्रीकरण मध्ये जर पतीलाही सवलत मिळते तिथे समानता समजून घेतात तर विधवा तेथे विधुरही समजून दोन्ही शब्द असावेत." जोडीदार पेन्शन नसलेले पुनर्विवाह नसलेले व लेकरांचे एकल पालक ही अल्पसंख्य का होईना पण विधवा विधुर शिक्षक बांधव आहेत..विधवा विधुर एकल पालक पण ना आजारपणाला रजा ना वेळसूट ना मतदान ड्युटी सूट.. दिवसभर आपण कर्मचारी असलो तरी संध्याकाळी दोन लेकरांचे पालक ही आहोत..पण इलेक्शन ड्युटी ला पहाटे पाचला सोडणारे कुणी नसले तर रात्री ही बुथवर थांबता येत नाही व एकदम पहाटे साधनही नसते..कुणासोबत जाताही येत नाही..सर्वांनाच वाहने चालवता येत नाही..मुख्यालयी राहतो.. पण समजून कोण घेतो.. काही अघटीत तर.. नंतर बोलणारे खूप..सांभाळणारे कुणीच नाही.. अडचणी येतात हे सोबतच्या शिक्षिका भगिनी शेजारी जवळच्या नात्यातील महिला देवाघरी तेथील अनुभव आहेत.
उत्तर द्याहटवा