डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
संकलित पेपर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संकलित पेपर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २

 STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन सापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. 

सदर संकलित मूल्यमापन- २(PAT-3) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात येतील.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांना याबाबतच प्रशिक्षण यु-ट्युबद्वार घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन २ (PAT - 3) vec 7 गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.qle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.


तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००


https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share


PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :


https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIQhbVIj2D7qQqW5Zj6/view?usp=sharing


संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)


https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7.





स्टार्स प्रकल्प अंतर्गत संकलित चाचणी पेपरचा तुटवडा

 संकलित चाचणीसाठी प्रश्नपत्रिका कमी...

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणूक चाचणी राज्यात प्रश्नपत्रिका कमी आहेत. आता या अपूर्ण प्रश्नपत्रिकांवर विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी? असा प्रश्न शिक्षकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनाही पडला आहे.



ऑक्टोबर अखेर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांची संकलित मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्या जात आहेत. मात्र त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी संख्येनुसार शाळांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शाळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संकलित मूल्यमापन चाचणी एकसाठी राज्यस्तरावरून मराठी गणित आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या. यात शाळांच्या पटसंख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित असताना प्रत्येक शाळेला त्या कमी संख्येने देण्यात आल्या. अनेक शाळांना तर चौथीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. 

एक प्रश्नपत्रिका आठ पानांची आहे. त्याची एक झेरॉक्स प्रत काढण्यासाठी कमीत कमी १६ रुपये खर्च येणार आहे, शाळांना खर्चासाठी अनुदान  नाही, मग झेरॉक्सचा खर्च कसा करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्टार्स प्रकल्प अंतर्गत संकलित चाचणी १ ली

 

यावर्षीच्या स्टार्स प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर आता संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक होऊ पाहत आहे या चाचणीचा वेळापत्रक आता   प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परीक्षेचे वेळापत्रक आपण खाली दिलेले पाहू शकतात



संकलित मुल्यमापन चाचणी (PAT)
विषयइयत्तादिनांक कालावधी गूण
तिसरी व चौथीसोमवार९० मिनिटे30
प्रथम भाषा (सर्व माध्यम) पाचवी व सहावी दि.३०/१०/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50
गणित सर्व माध्यमतिसरी व चौथीमंगळवार९० मिनिटे30
पाचवी व सहावी दि.३१/१०/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50
तृतीय भाषा (इंग्रजी )तिसरी व चौथीबुधवार९० मिनिटे30
पाचवी व सहावी दि.०१/११/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50

संकलित चाचणी प्रथमसत्र नमूना चाचणी

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह नगर यांच्यातर्फे संकलित मूल्यमापन प्रथम सत्र नमुना चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.



 इयत्ता पहिली ते चौथी सेमी माध्यम तसेच इयत्ता पहिली ते सहावी मराठी माध्यम नमुना दाखल ही चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आपल्या वर्गासाठी आपण आवश्यक त्याप्रकारे चाचणी तयार करावी.  


१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी



इयत्ता १ ली संकलित चाचणी




इयत्ता २ री संकलित चाचणी




इयत्ता ३ री संकलित चाचणी




इयत्ता ४ थी संकलित चाचणी



इयत्ता ५ वी संकलित चाचणी



इयत्ता ६ वी संकलित चाचणी



इयत्ता ७ वी संकलित चाचणी



इयत्ता ८ वी संकलित चाचणी






आकारिक चाचणी डाऊनलोड करा....




विशेष सहकार्य 
श्री मच्छिंद्र कदमसर

संकलन 
प्रकाशसिंग राजपूत 
समूहनिर्माता 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

टीम डिजिटल व शिक्षक मित्रसमूह