डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राईट टु सर्व्हिस विषयी जाऊन घेऊया....

 महाराष्ट्र राज्यात  'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय.

 यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43  सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.


तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकारची वेबसाईट


www.aaplesarkar.maharashtra.gov.in


वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.


कोण कोणत्या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...

महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार


विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.

या सेवांचा आहे समावेश....


• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

• मिळकतीचे प्रमाणपत्र

• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र

• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

• पत दाखला

• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज

• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र

• भूमिहीन प्रमाणपत्र

• शेतकरी असल्याचा दाखला

• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र

• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

• जन्म नोंद दाखला

• मृत्यु नोंद दाखला

• विवाह नोंदणी दाखला

• रहिवाशी प्रमाणपत्र

• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

• हयातीचा दाखला

• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

• निराधार असल्याचा दाखला

• शौचालयाचा दाखला

• विधवा असल्याचा दाखला

• दुकाने आणि अस्थापना नोंदणी

• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण

• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी

• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी

• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण

• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी

• सेवानियोजकाची नोंदणी

• शोध उपलब्ध करणे

• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे

• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड

'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.



*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*

नवोदय विद्यालय मेगाभरती लवकरच #jobs

 नवोदय विद्यालय समिती (NVS)कडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु होत आहे. जवळपास दोन हजार पदांसाठी ही भरती असून 10 फेब्रुवारीच्या आधी या पदासाठी अर्ज करायचा आहे.




गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार नवोदय विद्यालय समिती भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर 10 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. यासाठी नवोदयच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. https://navodaya.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

           

रिक्त पदांचा तपशील
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण 1925 रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची 5 पदे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) 2 पदे, महिला कर्मचारी परिचारिका 82 पदे, सहाय्यक विभाग अधिकारी 10 पदे, लेखापरीक्षा सहाय्यक 11 पदे, कनिष्ठ अनुवाद अधिकारी 4 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 1 पद, लघुलेखक 22 पदे, संगणक परिचालक 4 पदे, खानपान सहाय्यक 87 पदे, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 630 पदे, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर 273 पदे, लॅब अटेंडंट 142 पदे, मेस हेल्पर 629 पदे आणि मल्टी स्टाफ हेल्पर 23 पदे आहेत.

 पात्रता काय असणार ?

ऑनलाइन परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ही ऑनलाइन परीक्षा 9 मार्च ते 11 मार्च 2022 या कालावधीत घेतली जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी व्यतिरिक्त, पदवीधर उमेदवार नवोदय विद्यालयातील गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, त्यामुळे उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

ऑनलाईन अर्जासाठी शुल्क ?
सर्व पात्र उमेदवार NVS शिक्षकेतर कर्मचारी भरती 2022 साठी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सहाय्यक आयुक्त पदासाठी, उमेदवारांना 1500 रुपये आणि महिला स्टाफ नर्ससाठी 1200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, लॅब अटेंडंट/मेस हेल्पर/मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 750 आणि इतर पदांसाठी रु. 1000 भरावे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.


7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत मा. आ. श्री.कपिल पाटील साहेब यांचा पाठपुरावा

 📣📣



राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत आमदार कपिल पाटील यांचं शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र.*

➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖


प्रति,

मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड,

शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य.




विषय -  राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत.....


महोदया,


सहाव्या वेतन आयोगामध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर ५२००-२०२०० (ग्रेड पे २८००) वेतनश्रेणी मिळाल्यानंतर चटोपाध्याय समितीने केलेल्या शिफारशीनुसार १२ वर्षानंतर मूळ वेतनात वाढ होऊन ग्रेड पे ४२०० रु. होत असे. अशी वेतनश्रेणी मिळत असून मूळ वेतनात ग्रेड पेमध्ये १४००/- रुपयांची वाढ होते. ही वाढ वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे साडेतीनपट होती. मात्र १ जानेवारी, २००४ नंतर सेवेत आलेल्या म्हणजेच दिनांक १ जानेवारी, २०१६ नंतर १२ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करताना Pay Matrix ही संकल्पना आणल्यामुळे चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ नष्ट झाला असून या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी मी विचारलेल्या तारांकीत प्रश्न क्र.६५ ला उत्तर देताना आपणही हा आर्थिक अन्याय होत असलेबाबत मान्य केलेले आहे.

शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ नष्ट झाला आहे. पर्यायाने १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ न मिळता नियुक्तीच्यावेळी जी वेतनश्रेणी मिळाली त्याच वेतनश्रेणीत सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे. याबाबत शासन स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.


तरी सदर शिक्षकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी खंड २ ची प्रसिद्धी करताना चटोपाध्याय वेतनश्रेणींची पूर्ववत रचना करून, दोन वेतनवाढीची तूट दूर या शिक्षकांना न्याय दयावा, ही विनंती. धन्यवाद!



आधीच जुन्या पेन्शनला हे शिक्षक मुकले आहेत. तसेच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ही एकमेव वेतनातील वाढ आहे जी सेवेत एकदाच तीही एकाच पदावर एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे राहिल्यावर मिळते. निवडश्रेणी २४ वर्षानंतर मिळत असली तरी ती लाभार्थ्यांपैकी फक्त २०% शिक्षकांनाच मिळत असल्याने, कित्येक शिक्षक ती घेण्याआधी मयतही झालेले आहेत. तरी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी मध्ये बदल करून ती सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळून दोन वेतनवाढीची तूट भरून काढेल अशी रचना करण्यास विनंती आहे.