राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी. असे आदेशात निर्गमित करण्यात आलेले आहे.
१. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या इ. १ ली ते इ. ४ थी, इ. १ ली ते इ. ७ वी, इ. ५ वी ते इ. ७ वी च्या किती शाळांना
इ. ५ वी / इ. ८ वी चा वर्ग जोडावयाची कार्यवाही अद्यापपर्यंत प्रलंबीत आहे.
२. तसेच राज्यातील किती जिल्हा परिषद शाळा संबंधीत नगरपालिका/ महानगरपालिका/ कटकमंडळे यांच्याकडे स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत,
अशी माहिती ही शिक्षण संचालकांना विचारण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.
या शाळेचा परिसर अगदी हिरव्यागार झाडांनी(मियावाॕकी घनवनाने) व्यापलेला आहे .शाळा अत्यंत दुर्गम डोंगर भागात असून शाळेचा परिसर फारच सुंदर आहे.
आंनददायी शिक्षणाचा सदैव वापर येथे होत आहे. शाळेतील दोन्हीही शिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण घेत आहे.
शाळेतील नाविण्यपुर्ण उपक्रम हे शाळेच्या एकूणच प्रगतीची उंची वाढवितात.
आज विद्यार्थ्यांना learning shapes ही activity ही jumping in shapes या आनंददायी कृतीतून घेण्यात आली. प्रकाशसिंग राजपूत यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना त्यांच्या चप्पलचा वापर करून आखलेल्या भौमितिक आकारात लावण्यात सांगितले तेव्हा आकाराची प्रत्यक्ष निर्मिती ते करु शकले व आनंद घेत खेळाच्या माध्यमातून शिक्षकांनी सांगितलेल्या आकारात उडी घेण्याचे एकूणच कसब ते शिकले.
सूचना ऐकून ठराविक आकार ओळखून उडी घेणे बौद्धिक व शारीरिक कसब वाढविणारे ठरले.