डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत हे उपक्रम होणार ....



शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार....





 दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रा संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. 

त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत....

 शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे,

 वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, 

विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे.

 या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत .


●खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे


अ. शालेय स्तरावर विद्यार्थ्यासाठी आयोजित करावयाचे उपक्रम

या फोटो अपलोड करावा. वैज्ञानिक रांगोळी दिलेल्या विज्ञानातील संकल्पना विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.



इयत्ता पहिली ते पाचवी


१. चित्रकला २. पोस्टर निर्मिती


१. माझी पृथ्वी. २. परिसरातील मित्र/सोबती.


चित्रकला / पोस्टर निर्मिती:


दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र /

पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार . 


निबंधलेखन:- 


इयत्ता सहावी ते आठवी


१. निबंध लेखन 

२. वैज्ञानिक रांगोळ्या


१. स्वयंपाकघरातील विज्ञान.



२. भविष्यातील दळणवळण.


३. माझी शाश्वत जीवनशैली. 

४. विज्ञानातील संकल्पना,


इयत्ता नववी व अकरावी


१. निबंध लेखन 

२. फोटोग्राफी/ व्हिडिओनिर्मिती



निबंध लेखन विषय :

१. माझा आवडता संशोधक.

२. भविष्यवेधी विज्ञान 

३. विज्ञानातील सफर.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन


दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. फोटोग्राफी/व्हिडिओ निर्मिती : गमतीजमती. दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ 


प्राथमिक,

१. वैज्ञानिक

१. समाजोपयोगी विज्ञान

 २. शाश्वत विकास


वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक | प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची लिहून त्याचा फो |व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.


प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी


१) प्रतिकृती निर्मिती 


२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती




प्रज्ञानंधाने जगातील १ नंबर कार्लसनला केले पराभूत

 एअरथिंग्ज मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीदरम्यान, त्याने जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला केवळ 39 चालींमध्ये हरवून कार्लसनचे सलग तीन विजय संपुष्टात आणले.



 प्रज्ञांनधाने 31 वर्षीय कार्लसनला पराभूत केले - सध्या जगातील नंबर 1 - काळ्या तुकड्यांसह ताराश विविधता गेममध्ये.

 कार्लसनने सलग तीन विजय मिळवले, परंतु प्रज्ञानंधाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर, नॉर्वेजियन खेळाडू काल लीडर बोर्डवर 11 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर राहिला.


 आठ फेऱ्यांनंतर आठ गुणांसह प्रज्ञानंधा संयुक्त 12व्या स्थानावर आहे.  याआधीच्या फेऱ्यांमध्ये,  आणि त्याने लेव्ह अरोनियनवर फक्त एकट्याचा विजय, दोन ड्रॉ आणि चार पराभवांचा समावेश केला.


 किशोरने अनिश गिरी आणि क्वांग लीम ले यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन-क्रिझस्टोफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

 Airthings Masters हा 16 खेळाडूंचा खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला प्राथमिक फेरीत विजयासाठी तीन आणि अनिर्णित राहण्यासाठी एक गुण मिळतो.  प्राथमिक टप्प्यात आणखी सात फेऱ्या आहेत.


 नेत्रदीपक खेळ म्हणजे प्रज्ञानंधाचा कार्लसनविरुद्ध बुद्धिबळाच्या कोणत्याही प्रकारातील पहिला विजय.


 " प्रज्ञानंधाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ला सांगितले की तो विजय कसा साजरा करणार आहे .


 बुद्धिबळातील प्रगल्भ, ग्रँडमास्टरची पदवी मिळवणारी प्रज्ञानंधा ही पाचवी सर्वात तरुण व्यक्ती आहे.  2018 मध्ये त्याला विजेतेपद मिळाले.

वाॕटर पार्क येथे अपघात शिक्षिकेचा मृत्यू

 पिकनिकसाठी आले होते विद्यार्थी आणि शिक्षक...



 हरियाणाच्या अंबालामध्ये आज वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात घडला. येथे एका खासगी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते. यादरम्यान वॉटर पार्कमध्ये तयार केलेल्या झोपाळ्यावर शिक्षक आणि विद्यार्थी बसले तर केबिनचा ग्रिल तुटला. 23 वर्षीय शिक्षिकेसह 3 विद्यार्थी खाली पडले.


खाली पडल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली, शिवाय विद्यार्थ्यांनाही जबर मार लागला आहे. हे ही जी आई होऊन जेवू घालत होती, तिचीच केली हत्या; व्यसनापायी तरुणाने सर्व संपवलं,

वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक... 


अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. त्यावेळी 23 वर्षीय रिया गर्ग हिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधोई गावातील जय पब्लिक शाळेत काम करीत होती. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात H2O पार्कमध्ये झाला. शिवाय वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराज वरील भाषण...

 संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.

 इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....




शिवराय..... राजं हे दैवत ....नविन गीत...

 स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩





*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*


*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां सारेच गडकिल्ले....*

*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*

*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*


*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*

*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*

*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*

*ताठ उभा मराठी मुलख  आजवर..*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*उभारला आदर्श...राज्य  कल्याणकारी,*

*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*

*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*

*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*

*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*

*आई भवानीचा,मिळून  आशीर्वाद ,*

*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*

 *संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*

*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा  झुकविलात,*

*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


   *✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️

           *औरंगाबाद*

         9960878457