डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 



विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.


एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी

 एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.



या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. 

ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष

या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात.

ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.

ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क

SC/ST/PDW/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.

महागाई भत्ता १ जानेवारीपासून मिळणार

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुधारणा करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय.

 दिनांक -17 ऑगस्ट 2022

दिनांक 1 जाने्वारी 2022 पासून महागाई भता 31% वरून 34%,

 1जाने ते 31 जुलै 22 पर्यंतची थकबाकी रोखीने ऑगस्ट 22 मध्ये मिळणार 



भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन

शासकीय कर्मचाऱ्यांना 3 % DA वाढ

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

थोरांच्या आठवणी लोकमान्य टिळक

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️



🇮🇳 *अमृत महोत्सवी स्वातंत्र्य  निमित्त ....*🇮🇳



*थोरांच्या आठवणी....*


           भाग १


🔮  *लोकमान्य टिळक*🔮




https://youtu.be/XORH0lm1oNE



*वाचक स्वर  - श्रीमती भारती डहाळे*

     ठाणे


*व्हिडीओ व प्रसारण*


*प्रकाशसिंग राजपूत*

     औरंगाबाद 


*विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा....👍🏻*