डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परीणामाबाबत शपथ घेणेबाबत..


 नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो, मुंबई यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्व युनिटसना त्यांच्या हद्दीतील सरकारी कार्यालये, शाळा, महाविदयालये अशा ठिकाणी 

अमली पदार्थाच्या दुष्परीणामाबाबत जनसामान्यात जागृती निर्माण होणे कामी तसेच त्याचा मुकाबला करण्यास सज्ज होण्याकरीता अमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परीणामाबाबत E pledge घेवुन जनजागृती करण्याबाबत कळविले आहे.


  सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र बोलावुन मौखीक शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करावे.

असे सुचविण्यात आलेले आहे.

आंतरजिल्हा बदली यादी पहा....

 सदर शपथ ऑन लाईन पध्दतीने घेण्याबाबत सविस्तर माहिती देवून प्रतिज्ञा घेतलेले एकुण अधिकारी / कर्मचारी शाळा एकूण संख्या शिक्षक व विदयार्थी एकुण संख्या व सर्व शाळांमध्ये सदर प्रतिज्ञा घेण्याचा उपक्रम राबवून विदयाथ्र्यांनी प्रतिज्ञा घेतानाचे फोटो सह माहिती सादर करायची आहे.


ऑन लाईन पध्दतीने शपथ घेण्यासाठी

 https://pledge.mygov.in/fightagainstdrugabuse 

ही लिंक देण्यात आलेली आहे.



आंतरजिल्हा बदली यादी जिल्हा निहाय

 आंतरजिल्हा बदली यादी पहा आता जिल्ह्यानिहाय...




डिजिटल समूह महाराष्ट्राच्या वतीने बदली झालेल्या तमाम शिक्षकांना मनापासून शुभेच्छा आपण स्व जिल्ह्यात जात आहात याचा निश्चितच मोठा आनंद आपल्या कुटुंबीयांना असणार आहे. व आपल्या कर्तृत्वाला आपल्या जिल्ह्यात नवीन भरारी मिळेल या नव्या उमेदीने आपण आपल्या जिल्ह्यात जाणार आहात सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!!!


  प्रकाशसिंग राजपूत 

    समूहनिर्माता 

    औरंगाबाद 


अहमदनगर

नागपूर

अकोला

नांदेड

अमरावती

नंदुरबार

औरंगाबाद

नाशिक

बीड

उस्मानाबाद

भंडारा

परभणी

बुलढाणा

पुणे

चंद्रपूर

रायगड

धुळे

रत्नागिरी

गडचिरोली

सांगली

गोंदिया

सातारा

हिंगोली

सिंधुदुर्ग

जळगाव

सोलापूर

जालना

ठाणे

कोल्हापूर

वर्धा

लातूर 

वाशिम

मुंबई उपनगर

यवतमाळ

मुंबई शहर

पालघर

आता होणार ४ हजार बदल्या

 शिक्षक बदली प्रक्रियेमधील ऑनलाइन बदलीचा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणजे आंतरजिल्हा बदली मध्ये 4000 शिक्षकांच्या बदल्या होणार असून .




या बदलांमध्ये अनेक शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये जाता येणार आहे.

 उद्यापर्यंत बदल्या जाहिर होणार आहेत .

 ऑनलाइन बदली मध्ये सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेली ही मोठी बदली ठरणार आहे .

सर्व बदली प्रक्रियेमध्ये जलद करण्यात येण्याचे  प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून या बदल्यांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.

 खूप शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्व जिल्हा जाण्याची संधी त्यांना या बदली प्रक्रियेमधून प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 



विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.


एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी

 एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.



या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. 

ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष

या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात.

ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.

ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क

SC/ST/PDW/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.