राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी. असे आदेशात निर्गमित करण्यात आलेले आहे.
१. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या इ. १ ली ते इ. ४ थी, इ. १ ली ते इ. ७ वी, इ. ५ वी ते इ. ७ वी च्या किती शाळांना
इ. ५ वी / इ. ८ वी चा वर्ग जोडावयाची कार्यवाही अद्यापपर्यंत प्रलंबीत आहे.
२. तसेच राज्यातील किती जिल्हा परिषद शाळा संबंधीत नगरपालिका/ महानगरपालिका/ कटकमंडळे यांच्याकडे स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत,
अशी माहिती ही शिक्षण संचालकांना विचारण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.
या शाळेचा परिसर अगदी हिरव्यागार झाडांनी(मियावाॕकी घनवनाने) व्यापलेला आहे .शाळा अत्यंत दुर्गम डोंगर भागात असून शाळेचा परिसर फारच सुंदर आहे.
आंनददायी शिक्षणाचा सदैव वापर येथे होत आहे. शाळेतील दोन्हीही शिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण घेत आहे.
शाळेतील नाविण्यपुर्ण उपक्रम हे शाळेच्या एकूणच प्रगतीची उंची वाढवितात.
आज विद्यार्थ्यांना learning shapes ही activity ही jumping in shapes या आनंददायी कृतीतून घेण्यात आली. प्रकाशसिंग राजपूत यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना त्यांच्या चप्पलचा वापर करून आखलेल्या भौमितिक आकारात लावण्यात सांगितले तेव्हा आकाराची प्रत्यक्ष निर्मिती ते करु शकले व आनंद घेत खेळाच्या माध्यमातून शिक्षकांनी सांगितलेल्या आकारात उडी घेण्याचे एकूणच कसब ते शिकले.
सूचना ऐकून ठराविक आकार ओळखून उडी घेणे बौद्धिक व शारीरिक कसब वाढविणारे ठरले.
23 जून ते 15 जुलै 2023 ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यासाठी आणि शिक्षकांकडून स्व-नामांकनासाठी वेब पोर्टल उघडणे
16 जुलै ते 25 जुलै 2023
जिल्हा / प्रादेशिक निवड समितीचे नामनिर्देशन होणार आहे
राज्याकडे पाठवले जातील.
26 जुलै ते 3 ऑगस्ट 2023
राज्य निवड समिती संघटना निवड समिती निवड यादी स्वतंत्र राष्ट्रीय ज्युरीकडे पाठवली जाईल
4 आणि 5 ऑगस्ट 2023
राष्ट्रीय ज्युरीसमोर सादरीकरणे करण्यासाठी सर्व निवडलेल्या उमेदवारांना शिक्षण मंत्रालयाकडून सूचना जारी केल्या जातील (एकतर सामान्य वर्षांप्रमाणे NCERT मधील भौतिक पद्धतीने किंवा कोविड मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ऑनलाइनद्वारे)
7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 ज्युरीद्वारे निवड प्रक्रिया नावांचे अंतिमीकरण
16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 माननीय शिक्षा मंत्री यांच्या मान्यतेनंतर निवडलेल्या उमेदवारांना सूचना
4 आणि 5 सप्टेंबर 2023 तालीम आणि पुरस्कार सोहळा
अर्ज आणि निवड प्रक्रिया:
सर्व अर्ज ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे प्राप्त होतील.
MOE पोर्टलमध्ये वेळेवर प्रवेश करण्याबाबत आणि पोर्टल डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे पोर्टलमध्ये डेटा एंट्री करताना तांत्रिक आणि ऑपरेशनल समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्ये/यूटीएसशी समन्वय सुनिश्चित करेल.
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते.
पण त्यांची बदली झाल्यानंतर प्रत्येकाचे अंत:करण भरून आले होते. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत वेळेचे भान न ठेवता या शाळेसाठी आणि तेथील मुलांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक म्हणून एक गुरु म्हणून अनेकांना मार्गदर्शन केले.