डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 166 वा

 चला सोपा करूया परिपाठ


*दिवस 166 वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख - ३ फेब्रुवारी २०२४

वार- शनिवार

तिथी-माघ शुक्ल ९ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब" 

भारतीय सौर दि ११, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

मराठी महिना पौष कृ १०


Today's almanac

 Date - 3 February 2024

 Saturday

 Tithi paush kru 10

 Shaka 1944 


 Ayana-Uttarayana

 Ritu - Shishir Ritu(Autumn season)


"Rajjab" month of Muslims 


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच यश मोठे असते.


Good Thought

 The more time you work with patience, the greater the success.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.


१९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)

१९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.

१९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.


कोडे

तीन पायांची तिपाई, त्यावर बसला शिपाई?

उत्तर : चूल आणि तवा

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान

1)राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 12 नोव्हेंबर


2) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

उत्तर : नायट्रोजन


3) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

उत्तर : सूर्य


4) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?

उत्तर : न्यूटन


5) सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद



General knowledge

 1) When is National Bird Day celebrated?

 Answer: 12 November


 2) Which gas has the largest amount in the atmosphere?

 Answer: Nitrogen


 3) What is the natural source of energy?

 Answer: Sun


 4) Who discovered the force of gravity?

 Answer: Newton


 5) How long does the sun rays take to reach the earth?

 Answer : 8 minutes 20 seconds


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सर्वेक्षण बंद करण्याबाबत.

 सर्वेक्षण बंद करण्याबाबत.



संदर्भाधीन पत्रान्वये दि.२.२.२०२४ रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि.२.२.२०२४ रोजीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी मुदतवाढीची मागणी करण्यात येऊ नये.


दि.२.२.२०२४ रोजी रात्री २३.५९ मिनिटानी सदर Software Application (APK) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात व संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठविण्यात यावे.असे आदेशात म्हटलेले आहे.






मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक ...

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक ...


राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी दि.३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.


२/- या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रान्वये विविध जबाबदा-या निश्चित करुन व सूचना तसेच व्हीसीव्दारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत.


३/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन माहिती भरण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र.११ वरील पत्रान्वये शाळांकडून माहिती भरताना येणा-या अडणींची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.


४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.


५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे. त्याकरीता आवश्यकतेनुसर सर्व मनुष्यबळाचा वापर करुन शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करुन अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.





शालेय परिपाठ दिवस 163 वा

 चला सोपा करूया परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.१/०३/२०२४ 

भारतीय सौर १0, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:-गुरूवार

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना रज्जब

मराठी महिना माघ शु ८


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 1/02/2024

 Indian Solar 10, Magh Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Friday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Autumn Season

 The holy month of Muslims "Rajjab"

Marathi month Magh Shu 8

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

गुरुवार, 01 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 07:09, 

खगोलीय दुपार: 12:48, 

सूर्यास्त: 18:28, 

दिवस कालावधी: 11:19, 

रात्र कालावधी: 12:41.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

ज्याला दोन हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही.


Good Thought

He who knows the value of two hands never prostrates himself at the feet of fate.

🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙

दिनविशेष

भारतीय तटरक्षक दल दिवस.


१८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.


१९९२: आजच्या दिवशी केंद्राशाशित प्रदेश दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून दर्जा मिळाला.


१९२९: जयंत साळगावकर जन्मदिन– ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)


२००३: कल्पना चावला मृत्यू दिन – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)


Special day


 Indian Coast Guard Day.


 1884: The first edition of the Oxford English Dictionary was published.


 1992: On this day the Union Territory of Delhi received the status of National Capital.


 1929: Birth of Jayant Salgaonkar – Jyotirbhaskar, author and entrepreneur (died: 20 August 2013)


 2003: Death anniversary of Kalpana Chawla – American astronaut of Indian origin (born: 1 July 1961)


🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞


म्हणी व त्याचा अर्थ


खाण तशी माती - आईवडीलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक हृअसते.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

चौकीवर बसली एक रानी, तिच्या डोक्यावर पाणी

उत्तर : मेणबत्ती

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान

1)मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?

उत्तर : 46


2) सर्वात मोठा ग्रह कोणता?

उत्तर : बृहस्पति


3) सर्वात लहान ग्रह कोणता?

उत्तर : बुध


4) आग्रा शहर कोणी बनवले आहेत?

उत्तर : सिकंदर लोदी


5) पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर : लाला लजपतराय


general knowledge

 1) How many chromosomes are there in human body?

 Answer : 46


 2) Which is the largest planet?

 Answer: Jupiter


 3) Which is the smallest planet?

 Answer: Mercury


 4) Who built the city of Agra?

 Answer: Sikandar Lodi


 5) Who is known as Punjab Kesari?

 Answer: Lala Lajpatrai


🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

बोधकथा

एक वडाचे झाड होते. 


त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते. 


ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे, इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला येतात.”


काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची सुद्धा तीच गत झाली. 


वादळ ओसरल्यावर गवत मात्र शाबुत होते. 


कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो. 



There was a banyan tree.


 There was grass around him.


 That tree used to say to that grass, “Oh, what is your method?  Whether the wind came from there you bent here, from here you bent there.. Look at me, I am stable in my place.  That's why people come to take shelter of me."


 A few days later, a big hurricane hit.  Many trees were uprooted by its force.  The same happened to the banyan tree.



 After the storm subsides, however, the grass is intact.


 Humbleness always protect a person form huge problems.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्लोक

संपूर्ण कुंभो न करोति शब्दं I  अर्धो घटो घोषमुपैति  नूनं I I

विद्वान्कुलीनो न करोति गर्वं I जल्पन्ति मूढास्तु  गुणैरविहीनाः I I


अर्थ :- भरलेल्या घड्यामध्ये पाणी ओतले तर तो आवाज अजिबात करत नाही पण रिकाम्या घड्यात पाणी ओतले तर खूप गडगडIट ऐकू येतो. त्याचप्रमाणे जो बुद्धिमान आहे तो बडबड करीत नाही परंतु अर्धवट शिकलेले लोक पहा कसे बडबड करीत आपले ज्ञान पाजळत असतात.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शालेय परिपाठ दिवस 162

 *चला सोपा करूया परिपाठ*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.३०/०१/२०२४ 

भारतीय सौर ८, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:-मंगळवार

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना रज्जब

मराठी महिना माघ शु ६


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 30/01/2024

 Indian Solar 8, Magh Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Friday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Autumn Season

 The holy month of Muslims "Rajjab"

Marathi month Magh Shu 6

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 मंगळवार, 30 जानेवारी 2024

सूर्योदय 07:09, 

खगोलीय दुपार: 12:48, 

सूर्यास्त: 18:27, 

दिवस कालावधी: 11:18, 

रात्र कालावधी: 12:42.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सुविचार*

 *सुखासाठी कुणापुढे हात पसरु नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल.*


Good Thought

*Don't extend your hand to anyone for happiness, time will be wasted, rather fight with the situation, good time will come.*


🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️🌤️


दिनविशेष


जागतिक दिवस:


कुष्ठरोग निवारण दिन


नशा मुक्ती संकल्प आणि शपथ दिवस.


आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस.


शहीद दिवस.


१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’


२००४: मंगळावर पाठविलेल्या अपॉर्चुनिटी अंतरीक्ष यानाने मंगळावर आयरन ऑक्साइड (गंज) असल्याचे शोधल्या गेले.


१९४८: महात्मा गांधी पुण्यतिथी (जन्म: २ आक्टोबर १८६९)



special day


 World Day:


 Leprosy Prevention Day


 Drug Free Resolution and Pledge Day.


 International Sarvodaya Day.


 Martyr's Day


 1999: 'Bharat Ratna' to Pandit Ravi Shankar


 2004: Iron oxide (rust) is discovered on Mars by the Opportunity spacecraft.


 1948: Death anniversary of Mahatma Gandhi (Born: 2 October 1869)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

काखेत कळसा आणि गावाला वळसा - हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे


*@*@*@*@*@*@*@*@*@*@*@*@*@*

कोडे

लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, पण ते मला कधीही खात नाहीत, ओळखा पाहू मी कोण?

उत्तर : प्लेट आणि चमचा


Puzzle

People buy me to eat, but they never eat me, know who I am?

 Answer : Plate and spoon

🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️


सामान्य ज्ञान

1  सध्या कोणता इंग्रजी महिना सुरू आहे?

उत्तर:- जानेवारी


2  सध्या कोणता मराठी महिना सुरू आहे?

उत्तर:- माघ


3 मुस्लिम धर्मियांचा कोणता महिना सुरू आहे?

 उत्तर:- " रज्जब" 


4 पारशी लोकांचा कोणता महिना सध्या सुरू आहे?

उत्तर:- शेहरेवार


5 सध्या कोणता ऋतू सुरू आहे?

उत्तर:- शिशिर ऋतू.


General knowledge

 1 Which English month is currently running?

 Answer:- January


 2 Which Marathi month is currently running?

 Answer:- Magh


 3 Which month of Muslim religion is on?

  Answer:- " Rajab"


 4 Which month of the Parsis people is currently running?

 Answer:- Shehrewar


 5 What season is it in now?

 Answer:- Autumn season.


🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

बोधकथा

मधमाशा आणि त्यांचा धनी 


एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.


तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'


तात्पर्य - कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.


Bees and their master


 A thief once stole a beehive from a garden.  The owner of the garden came and saw that the hive had disappeared!  Then, while thinking that who might have stolen it, the bees who had gone out, came there with honey, and seeing that there were no hives, he must have taken his hive.  Understanding this, they immediately attacked the owner.


 Then the owner said to them, 'Oh, ungrateful animals, you have let him who stole your hive.  And I, your owner, am worried about what to do now that your hive has been stolen.  So you hurt me by kicking?  Wow, wow!'


 Meaning - Sometimes we hurt a friend 

We trouble him as an enemy.  But it is foolish to do so.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्लोक

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।

अर्थ : अखंडमंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी (आम्हाला) त्यांच्या चरणांशी घेतले त्या श्रीगुरूंना आमचा नमस्कार असो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏