डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ

थोडक्यात शिक्षक बदल्यांचे टप्पे...


पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ देण्यात आली.


पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार वैयक्तिक माहिती


दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज


जात प्रवर्गानुसार रिक्त जागांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे घ्यावे लागते ना हरकत प्रमाणपत्र...


एकाच जिल्ह्यात तीन ते पाच वर्षांपर्यंत काम केलेले शिक्षकच बदल्यांसाठी पात्र


 दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्याने त्यात पारदर्शकता नसल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे त्यासंदर्भातील कार्यवाही झाली नाही. शाळा सुरु होताच पोर्टल निर्मितीची तयारी सुरु होणे अपेक्षित होते, पण त्यासाठी विलंब लागला. त्याचवेळी 'एनआयसी'ने पोर्टलचे काम करण्यास नकार कळविला. त्यानंतर नवीन खासगी संस्था नेमण्यात आली. 

आश्वासित प्रगती योजना १०/२०/३० खाजगी शिक्षक बाबत शिफारस

आता सरकारकडून त्या कंपनीला सर्व डेटा देण्यात आला असून अजूनही ३० टक्के काम राहिलेले आहे. त्यामुळे शिक्षकांची प्राथमिक माहिती भरणे (नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक, जात प्रवर्ग, शाळा, जिल्हा, बदली कुठे पाहिजे ज्याची माहिती) अपेक्षित आहे. सध्या पोर्टल अर्धवट स्थितीत असल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडेच ती माहिती ऑफलाइन द्यावी लागत आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दोन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने त्या शिक्षकांच्या बदल्या होतील. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अंदाजित दोन महिने लागतील, असा अंदाज आहे.

आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस ..

 राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत.


संदर्भ:- 

१. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडील पत्र क्र. अंदाज-२०१/ सुसेआप्रया/ २०२२/२२१६ दिनांक १३.०४.२०२२

 २. आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक २७.०४.२०२२ राजीच्या बैठकीतील निर्देश,



शासन निर्णय दिनांक ३१.०७.२०१९ अन्वये राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना लागू करणे व शिक्षकांच्या वेतनश्रेणीशी संबंधित इतर बाबींच्या अनुषंगाने शिफारस करण्याकरीता मा. आयुक्त (शिक्षण) याच्या अध्यक्षतखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


अभ्यास गटाचा अहवाल शासनास दिनांक ०६.०५.२०२० रोजी सादर केलेनंतर शासन पत्र दिनांक २३.११.२०२१ नुसार सदर अहवालामध्ये अनुक्रमे १ ते ६ त्रुटी असलेबाबत कळविण्यात आलेले होते.

 त्यानुषंगाने मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे कडून शासन पत्रात नमूद असलेल्या ६ मुद्द्यांपैकी अनुक्रमे १ ते ४ मुद्द्यांचा पूर्तता प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आलेला होता.


मुद्दा क्र. ५ व ६ बाबतची सविस्तर माहिती शिक्षण संचालक, प्राथमिक व शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना दिनांक २७.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत सादर करणेबाबत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही सदर मुद्यांबाबतची सविस्तर माहिती अप्राप्त आहे. तरी सदरील माहिती तात्काळ सादर करणेबाबत  विनंती करण्यात आलेली आहे.


 सदरील शिफारस पत्र पहा....

बदली प्रक्रिया .... माहितीस्तव

 शिक्षक बदली- 2022  update...


शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार

1) Phase 1 : शिक्षक माहिती updation

2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली

3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली





आता लवकरच *Phase 1* सुरू होत आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2    व 3 सुरू होईल.


*Phase 1*.मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल

शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल

 तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील

I) Personal Information 

ii) Employee Information 

Personal Information *read only* Mode मध्ये असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.

 Employee information मध्ये माहिती बरोबर असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करावी व submit करावी.


 Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.

 सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.

BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.

 EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल करतील.

 EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.

तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात CEO कडे Social अपील करता येईल.

 CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.


अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आहे. 

@ अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.

@ प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update करतांना OTP आवश्यक असणार आहे.

@ बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.


बदलीबाबत महत्त्वाची पीडीएफ डाऊनलोड करा...


👆 फक्त माहितीस्तव

स्टेट बॕकेत नोकरी शेवटचे २ दिवस

 स्टेट बँक ऑफ इंडिया  ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.



या पदांसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच, 17 मे 2022 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, SBI स्पेशल कॅडर ऑफिसरच्या एकूण 35 जागा आहेत.

 यामध्ये 29 पदांची कंत्राटी पद्धतीनं भरती होणार असून 7 पदांची नियमित भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे.


महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022
VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2022
व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2022
लेखी परीक्षेची तारीख : 25 जून 2022
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : 16 जून 2022


रिक्त जागांचा तपशील :

सिस्टम ऑफिसर : 7 पदं
कार्यकारी : 17 पदं
वरिष्ठ कार्यकारी : 12 पदं
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1 पद
उपाध्यक्ष आणि प्रमुख : 1 पद
वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11 पदं
व्यवस्थापक : 2 पदं
सल्लागार : 4 पदं

जिल्हा परिषेद आरोग्य खात्यात मेगाभरती...

निवड प्रक्रिया अशी होणार...

या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल, जी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. सिस्टम ऑफिसर चाचणी अभियंता आणि वेब डेव्हलपर या पदासाठी व्यावसायिक ज्ञान चाचणी 150 गुणांपैकी आणि मुलाखत 25 गुणांपैकी यांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


बदली पीडीएफ

 

शिक्षक बदलीबाबत मार्गदर्शिका डाऊनलोड करा....






राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय...पहा

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संगणकीय बदली प्रक्रिया 2022

 📺डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र💻


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संगणकीय बदली प्रक्रिया 2022




    TEACHER PROFILE UPDATATION & PHASE 1 व 2 बाबत मार्गदर्शनपर PDF मराठी व हिंदी भाषेमध्ये यात Ceo,Eo, Beo login बाबतव शिक्षक बदली संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेले आहे....


   






वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर

 

वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर



संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या खालील लिंक ला टच करून जिल्हा व तालुका सबमिट करावा त्यानंतर तालुक्यातील सर्व शाळांची यादी आपल्या समोर अपडेट होईल त्यानंतर आपली शाळा शोधून Show teacher वर  क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांची नावे आपल्यासमोर दिसून येईल*


https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx




तळपता ज्वाला.... वीर शंभो.... शुर शंभो....




 *🚩 शुरवीर, महापराक्रमी ,बाहुबली शुर योद्धा छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा🚩🚩🚩* 

गीतगायन - श्री सुभाष शिंदे

गीतलेखन -  प्रकाशसिंग राजपूत 


https://youtu.be/_ceLAgaGbkE

तळपता ज्वाला गीत पहाण्यासाठी......



*🚩वीर शंभो ,शुर शंभो....🚩* 


*तळपता ज्वाला उठला,*

*जेव्हा शंभुराजा छत्रपती जाहला,*

*वणवा शौर्याचा सर्वत्र भडकला,*

*प्रजेच्या मनी सिंह वसला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 


*विजेचा  कडकडाट  असा,*

*तेज नवा स्वराज्यास मिळाला,*

*गौरव या मराठी मुलखाचा,*

*अभिमान या मातीचा राखला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*पराक्रम असा दिगला,*

*मावळे लढूनी चौफेर शत्रूला,*

*चमचमता तारा या उंच ,  नभात,*

*राजा शक्तीशाली या विश्वात ,*

*वीर शंभो,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*अंखड दीप हा या राष्ट्राचा*

*इतिहास शौर्याचा रचला,*

*अन्याय  कुणावर नव्हता  मान्य ,*

*बाहुत बळ असे आणला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



  🖋 *प्रकाशसिंग राजपूत*🖋

          *औरंगाबाद*

       9960878457


  हे गीत जर स्टुडिओत बनावे आपली इच्छा असल्यास कृपया आपले योगदान 9960878457 यावर संदेश पाठवू शकता.


जिल्हा परिषेद आरोग्य खात्यात मेगाभरती

 राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार 


प्रेरणादायी अधिकारी ...

 *प्रेरणादायी अधिकारी ..श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम शिक्षणाधिकारी  (प्राथमिक ) औरंगाबाद 






 दुर्गम डोंगर भागातील शाळेवर काम करतांना त्यावेळी तालुक्याच्या सर्वाच्च अधिकारी गटशिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण मॕडम यांनी  मुरुमखेडावाडी शाळेची प्रगती पहाण्यासाठी शाळेला भेट द्यायची  आहे, "रस्ता जरी कठीण असेल तर कार जिथ पर्यंत जाईल तिथ पर्यंत कारने व पुढे मी पायी चालून येईल ...."

     इतकी प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या सामान्य राहणी पण उच्च विचारसरणीचे त्याचे व्यक्तीमत्व निश्चितच प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल.


 *हौसलो से सब हासील नही होता है,*

*कुछ लब्ज तारिफोके अंजाम तक ले जाते है ....*

१८ डिसेंबर २०१९ ला आदरणीय मॕडम यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासून शाळेच्या भौतिक सुविधा, सोलार डिजिटल क्लास तसेच आमच्या शाळेची परसबाग ही पाहिली. कठीण परिस्थितीत त्या शाळेवर येऊन आमचे पाठबळ वाढविणारे ठरले.


          अवघ्या वर्षभरात दुसरी शाळेवर भेट  झाली ती घनवन उदघाटन प्रसंगी निश्चितच मुरुमखेडावाडीच्या विकासामध्ये आदरणीय चव्हाण मॕडम यांचा मौल्यवान हातभार आहे. कारण


"A Decent Leader think about the outcome, and Result of an idea before implementing it...."





    हे सत्यात नक्कीच उतरले. 

Design for change  अंतर्गत मुरुमखेडावाडी शाळेने भाग घ्यावा हे शब्द आदरणीय चव्हाणमॕडम यांचे विद्यार्थी व आम्ही  पाळत सहभागी होत दोन वर्ष सर्वात्तम अशा स्टोरीज घडल्या " *आमचा अभ्यासकट्टा* २०१९  व २०२० जागतिक करोना महामारी आलेली  असतांना  *" हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू.."*

   यानेच वाडीत करोनाने एकही   आजारी  पडलेला नाही व भाग्यवान लेकरांच्या प्रयत्नाने एक ही मृत्यू झालेला नाही.

       इतके प्रभावी उपक्रमांना आदरणीय मॕडमची दाद आणखी प्रेरक ठरत आम्हाला  २०२१ मध्ये *जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार*  पटकावता आलेला आहे.




"🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂


*कर्तव्य जागवती आपली वाणी,*

*ध्येर्य नवे देती आपली थाप,*

*भविष्य उज्वल करते दूरदृष्टी ,*

*आत्मविश्वास जागवते आपली साथ....*




 *सदैव नवा तेज ओसरीत आपल्या छायेत नवीन शिक्षणाच्या प्रयोगाने छाप निर्माण झाली.*

      *आदरणीय शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*💐💐💐🌹🌹🌹🎂🎂🎂


              *शुभेच्छुक*


     *प्रकाशसिंग राजपूत*

सहशिक्षक ( मुरुमखेडावाडी )

समूहनिर्माता ( डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )