डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावे शिक्षणमंत्री

 राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे.




बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या.


सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

प्रशांत बंब व शिक्षक आमने सामने पहा ... Click here

मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे.

 त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा.


 हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



छ. संभाजीनगर ढगफुटी...

 छत्रपती संभाजीनगर मध्ये बाप्पाच्या आगमनांसह मुसळधार पाऊस  झाला .

अगदी जोरदार पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात शेतकरी पाऊस नसल्यामुळे चिंताग्रस्त झाला होता. परंतु गणेश आगमनासह पाऊस अगदी ढगफुटी समान पाऊस झाल्याने एकदम आनंदाचे वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहे .

पावसाचा जोर इतका होता की अनेक ओढे भरभरून  वाहून  निघाले .

आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पाऊस किती जोरदार होता. आपण अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण लगेच या चॅनलला सबस्क्राईब करावं.

 गणेश आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!


जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

बाप्पा आला .... पाऊस झाला...
https://youtu.be/zaarr1Td1mY



शाळेत पत्रकार आले खाली हात गेले....

साफल्य नविन काव्यरचना

मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे. मराठी काव्य मनास मंत्रमुग्ध करणारा प्रकार मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ ...


आता Flipkart वर माझे पुस्तक खरेदी करा... आपल्या प्रियजनास भेट देण्यास उत्तम...खास १०%सवलती दरात




साफल्य.....



जगण्याची प्रीत ह्या जीवना,

राखूनी मनी किती वेदना,

असह्य काळ जरी टळेना,

सौदार्य स्वतःशी दावेना,



उरात दाटे अवेहलना,

कीर्तीचे नातं हे कळेना,

फिरुनी जगी मन भरेना,

साफल्य कधी लाभेलना,



अंतकरणास रुप भावेना,

 उदासी अखेर मिटेलना,

दीव्यत्वाची ओढ मना,

तेज कर्तुत्वाचा उभारेलना....



सोडीत ज्वलंत भावना,

कुणास का मी कळेना,

विराम माझ्याच जीवना,

प्रिये तुला मी दिसेना.....



   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद