डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावे शिक्षणमंत्री

 राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे.




बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या.


सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

प्रशांत बंब व शिक्षक आमने सामने पहा ... Click here

मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे.

 त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा.


 हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: