डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

काव्यरंग पुस्तका विषयी....

 🏵️🌼💐🙏🙏💐🌼🏵️

*कविमनाचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या काव्यरंग कवितासंग्रहाविषयी थोडसं* ...............

...................... *श्री एन बी वाघ.* 

.........................औरंगाबाद




मन असावे,,,,,,, 

तेलासारखे तरल, 

पाण्यासारखे पतळ,

बीजा सारखे संवेदनशील, 

आरशासारखे निर्मळ,

जिथं जातं तिथं एकरूप होतं मग

नुसत्या कल्पनेनं हेलावुनी जातं.

हे सगळं करतांना.........

त्यानं मातृभाषेशी इतकं समरस व्हावं की मायबोलीलाही आपला आभिमान वाटावा.

आसंच काहीसं..............

 *काव्यरंग* या कविता संग्रहाच्या रूपानं मनाच्या भावणेच्या विविध छटा शब्दबध्द करणारे *कविमनाचे शिक्षक आदरणीय प्रकाशसिंग राजपुत सर* .............

तसं पाहीलं तर वाचुन पाहण्यातील उशिर प्रतिक्रियेला दिरंगाई करून गेला त्याबद्दल क्षमस्व.

परंतु जेव्हा प्रत्यक्ष वाचन झाले आणि मग मन भरून आले.व मी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल लिहिता झालो.

 *अनेकाविध कविंच्या प्रतिभाशक्तितुन साकारलेल्या काव्यानं मराठी कविता समृध्द झाली हे सर्वास अवगत आहेच.* पण *बालमनाला आकार देतांना आपल्यातील काव्यगुण या कवितासंग्रहाच्या रूपाने एकरूप झाला हे विशेष म्हणावे लागेल.* शिक्षणासारख्या पवित्रा क्षेत्राशी आपली नाळ घट्ट ठेवतांना आपण केलेली निर्मिती कौतुकास्पद व विद्यार्थी प्रेरक राहील यात शंका *नसावी.

काव्यरंग हे पुस्तक खरेदी करण्यासाठी click here...

मन मारून जगण्यापेक्षा मनात आलं की व्यक्त होणं हीच खरी प्रतिभा* ती आपण जपली व आपल्या करिअरला साजेसं काम हाती घेतलं *छोट्यातला मोठा आशय शब्दबद्ध केलात* ही जमेची बाजु असुन आशीच नवनिर्मिती आपल्या हातुन होत राहो.हीच अपेक्षा ठेऊन *आपल्या यापुढील निर्मितीला भरभरून शुभेच्छा देतो.* 

असंख्य कामामुळे मला आजतागायत वेळ भेटला नाही.परंतु आज नांदेडशहरी मुक्कामास आसतांनाही न राहुन आपल्या काव्यसंग्रहाबद्दल मला थोडं व्यक्त होणं क्रमप्राप्त वाटलं.

.................. *आपला स्नेहांकित* 

..................... *श्री एन बी वाघ* 

.............................औरंगाबाद

🏵️🌼🙏🙏💐💐🙏🙏🌼🏵️

माझ्या मना.... नविन गाणे

 आपल्या बांधवाने कला क्षेत्रात या गीताच्या रुपाने पदार्पण  केलेले आहे. नक्कीच त्यांच्या यशस्वी भवितव्याचे आपण सारे साक्षीदार होऊ या. सर्वांना विनंती जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व सरांचे युटूब चॕनल सबस्क्राईब अवश्य करा.





https://youtu.be/ZUEfdqtdp00

 

मी प्रताप गीते माझे पहिले रोमँटिक सॉंग घेऊन आलेलो आहे तरी गाणं नक्की *like* करा माझं चॅनेल *subscribe*  आणि   व्हिडीओ जास्तीत जास्त *share* करा.


 *गीतकार /गायक* - *प्रताप्  गिते सर* 


 *संगीत संयोजन* - संजय पाठक 

 *सिनेमॅटोग्राफी* - कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


 *एडिटिंग* -कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


Lyrics – Pratap Gangadhar Gite

Music Director : Pratap Gangadhar Gite

Music Arranging & Recording Studios : Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Singer - Pratap Gangadhar Gite

Direction - Kailas Bhalekar 

Cast : Pratap Gite , Asha Gite , Athang Gite , Ojaswi Gite

Special Thanks : Sagar Labade ,  Naresh Sonawane , Mahesh Muke , Yogesh Khandagle , AC collection 

Music Credits Music Composer & Arranger : Pratap Gite - Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Video Credit - Direction - Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

DOP -  PRAPTI  PHOTOS & FILMS , Rushi Shinde , Mayur Gaikwad , Suyog More 

Editing – Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. 



मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी आणि याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यभरातील शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकातच लिहिण्यासाठी वह्यांची पानं लावण्याच निर्णय घेण्यात आला होता.

यामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांसाठी किती पानांच्या वह्या लागतात याची माहिती शिक्षकांना भरायची आहेत. त्यासोबतच आणखी प्रश्न या संदर्भात शिक्षकांची मत जाणून घेण्यासाठी विचारले आहेत.

शिक्षकांना खालील  प्रश्न विचारले जात आहेत...

कोणत्या इयत्तेपासून पाठाच्या नोंदी वह्यांमध्ये काढतात ?

वह्याची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यात विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल ?

वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यास वहीचा वापर थांबेल का ?

या योजनेचा लाभ वर्गातील किती टक्के विद्यार्थ्यांना होईल ?

वर्गात शिकत असताना विद्यार्थी या पानांवर महत्त्वाच्या नोंदी नोंदवतील का ?


या योजनेबद्दल आपण आपले मत नोंदवावे ?

आपण ही याबाबत आपला अभिप्राय नोंदवा...लिंक वरील माहिती भरण्यासाठी click here


याबाबत शासनाचा उद्देश -

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने

वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केली