🏵️🌼💐🙏🙏💐🌼🏵️
*कविमनाचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या काव्यरंग कवितासंग्रहाविषयी थोडसं* ...............
...................... *श्री एन बी वाघ.*
.........................औरंगाबाद
मन असावे,,,,,,,
तेलासारखे तरल,
पाण्यासारखे पतळ,
बीजा सारखे संवेदनशील,
आरशासारखे निर्मळ,
जिथं जातं तिथं एकरूप होतं मग
नुसत्या कल्पनेनं हेलावुनी जातं.
हे सगळं करतांना.........
त्यानं मातृभाषेशी इतकं समरस व्हावं की मायबोलीलाही आपला आभिमान वाटावा.
आसंच काहीसं..............
*काव्यरंग* या कविता संग्रहाच्या रूपानं मनाच्या भावणेच्या विविध छटा शब्दबध्द करणारे *कविमनाचे शिक्षक आदरणीय प्रकाशसिंग राजपुत सर* .............
तसं पाहीलं तर वाचुन पाहण्यातील उशिर प्रतिक्रियेला दिरंगाई करून गेला त्याबद्दल क्षमस्व.
परंतु जेव्हा प्रत्यक्ष वाचन झाले आणि मग मन भरून आले.व मी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल लिहिता झालो.
*अनेकाविध कविंच्या प्रतिभाशक्तितुन साकारलेल्या काव्यानं मराठी कविता समृध्द झाली हे सर्वास अवगत आहेच.* पण *बालमनाला आकार देतांना आपल्यातील काव्यगुण या कवितासंग्रहाच्या रूपाने एकरूप झाला हे विशेष म्हणावे लागेल.* शिक्षणासारख्या पवित्रा क्षेत्राशी आपली नाळ घट्ट ठेवतांना आपण केलेली निर्मिती कौतुकास्पद व विद्यार्थी प्रेरक राहील यात शंका *नसावी.
काव्यरंग हे पुस्तक खरेदी करण्यासाठी click here...
मन मारून जगण्यापेक्षा मनात आलं की व्यक्त होणं हीच खरी प्रतिभा* ती आपण जपली व आपल्या करिअरला साजेसं काम हाती घेतलं *छोट्यातला मोठा आशय शब्दबद्ध केलात* ही जमेची बाजु असुन आशीच नवनिर्मिती आपल्या हातुन होत राहो.हीच अपेक्षा ठेऊन *आपल्या यापुढील निर्मितीला भरभरून शुभेच्छा देतो.*
असंख्य कामामुळे मला आजतागायत वेळ भेटला नाही.परंतु आज नांदेडशहरी मुक्कामास आसतांनाही न राहुन आपल्या काव्यसंग्रहाबद्दल मला थोडं व्यक्त होणं क्रमप्राप्त वाटलं.
.................. *आपला स्नेहांकित*
..................... *श्री एन बी वाघ*
.............................औरंगाबाद
🏵️🌼🙏🙏💐💐🙏🙏🌼🏵️
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.