डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षणाधिकारी लोहार यांना कोठडी

 

सोलापूर मधील  कोंडी येथील शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. लोहार यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर शिक्षक वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानाची तपासणी झालेली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये ती केली जाणार आहे.

केंद्रप्रमुख पदभरतीबाबत आदेश

 केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत पत्र .

रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०: ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल सदर पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यांत Excel शिट मध्ये उक्त माहिती संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावी जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल..






बदली अपडेट

 📣📣📢📮📮📮📢📣📣

*जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates*



*दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार*

*संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच  (दि ५/११/२०२२ ते  ७/११/२०२२) जाहीर करावे लागणार.*



*बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.*


*प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.*


*संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.*


*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.*


*वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.*


*केवळ माहितीस्तव..* 


*बदली पोर्टल जरी सुरू असले तरी बदली पोर्टलवर फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन होत आहे.*


*शिक्षकांची लॉगिन सध्या होत नाही. शिक्षकांनी सध्या पोर्टलवर कोणतीही प्रक्रिया करायची नाही. दिनांक पाच नोव्हेंबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी बदली हवी किंवा नको एवढेच नोंदवायचे आहे.*

*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻