महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे ठळक विश्लेषण क्षेत्रानुसार पाहू या.....
कृषी
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी २३ हजार ८८८ कोटी
आरोग्य क्षेत्रासाठी ५ हजार २४४ कोटी रुपये
मनुष्यबळ विकासासाठी ४६ हजार ६६७ कोटी तरतूद
पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी २८ हजार ६०५ कोटी
उद्योग व ऊर्जा विभागासाठी १० हजार १११ कोटींची तरतूद
नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान
भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी
सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी ३ वर्षांत एक हजार कोटी रुपये देणार
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ
बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यासाठी साहाय्य
किमान आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदीसाठी ६ हजार ९५२ कोटींची तरतूद
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी पुढील आर्थिक वर्षात ८५३ कोटी ४५ लाख रुपये
मृद व जलसंधारणाची दोन वर्षांत ४८८५ कामे पूर्ण करणार
सन २०२२-२३ मधे ६० हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दिष्ट
रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये केळी, ड्रॅगन फ्रूट, ॲव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळपिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश
देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा
सार्वजनिक आरोग्य
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, नगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांचे प्रथम दर्जाचे 'ट्रॉमा केअर युनिट'.
२०० खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षांत 'लिथोट्रिप्सी' उपचार पद्धती सुरु करणार.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक 'फेको' उपचार पद्धती सुरु करणार
५० खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व ३० खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार.
मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार
हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, नगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांची महिला रुग्णालये स्थापणार
जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद
मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापणार
पुणे शहराजवळ अत्याधुनिक 'इंद्रायणी मेडिसिटी'
रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी ५०० कोटी रुपये खर्चून 'इनोव्हेशन हब' स्थापणार
स्टार्ट अप फंडासाठी १०० कोटी
मनुष्यबळ विकास
एक लाख २० हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना 'ई शक्ती' योजनेतून मोबाईल सेवा देणार
बालसंगोपनाच्या अनुदान निधीत ११२५ रुपयांवरुन २५०० रुपयांपर्यंत वाढ
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 'अमृत महोत्सवी' महिला व बाल भवन उभारणार
नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करणार
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सींग मशिन
दळणवळण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 'टप्पा-२' अंतर्गत दहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७५०० कोटी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
१६०३९ कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन सुरु.
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीन हजार नवीन बसगाड्या व १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसाहाय्य.
शिर्डी, रत्नागिरी, अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे, गडचिरोलीला नवीन विमानतळ
उद्योग
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत ९८ गुंतवणूक करारातून १,८९,००० हजार कोटी रुपये गुंतवणूक आणि रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी
ई-वाहन धोरणांतर्गत सन २०२५ पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा दहा टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा २५ टक्के करण्याचे उद्दिष्ट. पाच हजार चार्जिंग सुविधा उभारणार.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३०,००० अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून एक लाख रोजगार संधी
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी १०० टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि.लातूर), मौजे साक्री (जि.धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात २५०० मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क.
"भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय" स्थापित करण्यासाठी १०० कोटी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त वढू बुद्रूक व तुळापूर या परिसरात स्मारकासाठी २५० कोटी
'छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना' सुरु करणार.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित गावांतील १० शाळांसाठी १० कोटी रुपये
मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडित स्थळांचा 'हेरिटेज वॉक'
रायगड किल्ला व परिसर विकासासाठी १०० कोटी
राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी
मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी सात कोटी प्रस्तावित.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव पाठविणार
'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत ५०० कोटींची तरतूद, स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा आता ३० हजार रुपये
औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरीता ४३ कोटी रुपये
अष्टविनायक विकास आराखड्याकरीता ५० कोटी
पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा आराखडा
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी ७५ कोटी
पर्यटन
कोयना, जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित
पालघर जिल्ह्यातील जव्हार, औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासासाठी अनुदान.
पुरातत्त्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय 'महावारसा सोसायटी'ची स्थापना करणार
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात 'आफ्रिकन सफारी' सुरु करणार.
पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार
स्मारके
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारणार,
महाराणी सईबाई स्मृतिस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी देणार
वार्षिक योजना
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १३,३४० कोटी रुपयांची तरतूद
वार्षिक योजना १,५०,००० कोटी, अनुसूचित जाती १२,२३० कोटी रुपये , आदिवासी विकास ११,१९९ कोटी रुपये
महामंडळे
बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रुपये.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन ७०० कोटी
अर्थसंकल्पी अंदाज
महसुली जमा ४,०३,४२७ कोटी रुपये
महसुली खर्च ४,२७,७८० कोटी रुपये
महसुली तूट २४,३५३ कोटी रुपये