डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#Mba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Mba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इग्नुतर्फे आॕनलाईन स्वरूपात M.B.A चा अभ्यासक्रम #mba,

 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नुने आता आॕनलाईन स्वरूपात M.B.A चा अभ्यासक्रम सुरु करत असून याबाबत संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाईट वर मिळणार आहे.

शिक्षणापासून वंचित असलेल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाचा ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. इग्नूने हा अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून सुरू केला आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमला जानेवारीपासून सुरुवात होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाढत्या जबाबदारीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. नोकरी-व्यवसायामुळे अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना इग्नूने सुरु केलेल्या ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमाचा फायदा घेता येणार आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी ....

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इग्नूची अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर जा. उमेदवारांना ५ वेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येणार आहे.

  •  ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट(H R M),
  • फायनान्शियल मॅनेजमेंट (Financial Management), 
  • मार्केटींग मॅनेजमेंट (Marketing Management),
  •  ऑपरेशन्स मॅनेजमेंट (Operations Management), 
  • सर्व्हिस मॅनेजमेंट (Services Management)

या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. इग्नूतर्फे एकूण २८ अभ्यासक्रम चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केले जाणार आहेत.