शिक्षणाधिकारी बदलीपात्र व अधिकारपात्र शिक्षक यादी आज प्रसिद्ध करणार....
शिक्षक बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट: शिक्षकांच्या प्रतिक्षेचा अंत
महाराष्ट्रातील शाळांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. शिक्षक बदली प्रक्रियेच्या अधिकृत पोर्टलवर नवीन वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. राज्यातील हजारो शिक्षक गेल्या काही आठवड्यांपासून या वेळापत्रकाची वाट पाहत होते. शिक्षण विभागाने अखेर दिनांक 24 मे 2025 रोजी हे वेळापत्रक अपलोड केले असून, बदलीबाबत यादी संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहेत.
शिक्षक बदली ही प्रक्रिया प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात होण्पापुर्वी पार पडते, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांना नव्या ठिकाणी रुजू होता येईल. यंदाही हेच उद्दिष्ट ठेवून शिक्षण विभागाने प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा समावेश होतो.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.