डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#Mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच.

 MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने आपला नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे. यंदाच्या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परंतु विद्यार्थ्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. हा आक्षेप विद्यार्थ्यांनी व्यक्तही करून दाखवला पण त्याला यश आले नाही.

अखेर या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून पुण्यात बालगंधर्व चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भांत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. गुरुवारी अखेर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला .

अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होणार होती. परंतु ती रद्द झाली. त्यानंतर बैठक न घेता आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला. या निर्णयाची माहिती ट्विट करून दिली. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जी काही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत आयोगासोबत चर्चा केली होती.

अवघड शाळेवर कोणते शिक्षक ठरले पात्र

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.

    • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

    • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

    • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.