शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.