पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख होत असतील तर पगारात कोणतीही वाढ होणार नाही.
वेतनवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगणारे पत्र
फक्त कामाचे स्वरूप बदलणार.
जे शिक्षक / मुख्याध्यापक वरिष्ठ किंवा निवडश्रेणी वेतन घेत असून ज्यांची केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांची केंद्र प्रमुख पदावरील वेतन निश्चिती होणार नाही, त्यांना शिक्षक/ मुख्याध्यापक पदावर अनुज्ञेय असलेले वेतन अनुज्ञेय राहील, तसे न केल्यास शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त व ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती घेतलेल्यांच्या वेतनात तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालेल्या, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देता येणार नाही.
पत्र पहा.....