शासकीय कर्मचारी यांच्यावर अवलंबित दिव्यांग भाऊ/बहीण असेल तरीही मिळणार बदलीतून सूट!
आजचा दि 26/08/2025 चा सामान्य प्रशासन शासन निर्णय
राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी/कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा/मुलगी/आई-वडील/वैवाहिक जोडीदार/भाऊ बहिण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व ज्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे. त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबीचा सारासार विचार करुन सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२६१४५२०६४२०७ असा आहे.