डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
वन्यजीवमंडळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वन्यजीवमंडळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शाळेत वन्यजीव मंडळ स्थापन करण्याबाबत...

 वन्यजीव मंडळ (Wildlife Club)


मानवाचे वर्तन पर्यावरण पूरक नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वनाच्छादन, वनक्षेत्रातील प्रचंड घट, मानव-वन्यजीव संघर्ष, जैवविविधतेतील असमतोल, जल, वायू, ध्वनी, मृदा यांचे प्रदुषण,अनेक प्राणी व वनस्पती प्रजातीचे समुळ उच्चाटण इ. अशा समस्या दिसून येतात त्यामुळे सध्या आहे ते वनक्षेत्राचे रक्षण करण्यास, त्यातील वृक्ष, प्राणी, पक्षी, वनसंपत्ती एकूणच जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन होण्यास पूरक असे जबाबदार वर्तन करणारे उद्याचे नागरिक घडविण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये वन्यजीव मंडळ (Wildlife Club) स्थापन करणे आवश्यक आहे.



वन्यजीव मंडळ (Wildlife Club):

पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन कार्यास हातभार लावून या कार्याचा प्रसार व रणारा शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांचा गट. प्रचार


Wildlife Club स्थापन करण्याची उद्दीष्टे:


१) शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची तसेच जैवविविधतेची ओळख करून देणे.




२) निरीक्षण, अनुभव घेणे, प्रयोग करणे, सर्वेक्षण नोंदी घेणे विश्लेषण करणे व यातून वन्यजीव/ पर्यावरण / जैवविविधता यांचे संरक्षण संवर्धन का आवश्यक आहे हे पटवून

 ३) वन्यजीवाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून देणे व त्यासाठीचे आवश्यक उपक्रम राबविणे.


४) वन्यजीवांचे संरक्षण संवर्धनास पूरक ठरेल असे वर्तन करण्यास प्रोत्साहन देणे. 

५) तरुण पिढीचा वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यात सहभाग घेणे.


६) निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वृत्ती तयार होईल असे पोषक वातावरण निर्माण करणे व यातून भविष्यकालीन निसर्गप्रेमी नागरिक घडविणे,


७) मानव वन्यजीव संघर्ष ही संकल्पना विषद करणे.


८) मानव वन्यजीव संघर्षाची कारणे सांगून त्यावरील उपायांचा शोध घेण्यासाठी चर्चा घडवून आणणे


९) पर्यावरण / जैवविविधता / वन्यजीव यांचे संवर्धन व संरक्षण या विषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे..


१०) वन्यजीव संरक्षण संवर्धन कार्यासाठी विद्यार्थी समाज यांच्यात आंतरक्रिया घडवून आणणे,


वन्यजीव मंडळाची (Wildlife Club) रचना:


मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक शाळेतील या विषयाची आवड असणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्यासह गावातील पर्यावरण प्रेमी नागरिक/पालक यांचा समावेश वन्यजीव मंडळात करावा. हे सर्व या क्लबचे सदस्य असतील.

परिसरात या विषयात रुची घेऊन पर्यावरण जागृती साठी काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था कार्यरत असल्यास त्यांचीही या कामात मदत घेण्यात यावी. कामाची विभागणी करून प्रत्येक कामाचा स्वतंत्र प्रतिनिधी निश्चित करून कामाची वाटणी करावी. वन्यजीव मंडळाची स्थापना करून शाळेत तसा फलक प्रदर्शित करावा,


दर दोन महिन्यात मंडळाची बैठक आयोजित करून झालेल्या कामाचा आढावा घेणे व पुढील कालावधीत घ्यावयाच्या उपक्रमांचे नियोजन करावे.


वन्यजीव मंडळ (Wildlife Club) स्थापन केल्यानंतर घ्यावयाचे उपक्रम :


● शाळेच्या, गाव परिसरातील गायरान, माळरान, झुडूपी जंगल, डोंगररांग, वनक्षेत्रात निसर्गसहली आयोजित करणे. ● विद्यार्थ्यांना तेथील पशु, पक्षी, फुलपाखरे, कीटक, वनस्पती (जैवविविधतेची) ओळख करून देणे.


• वरिष्ठ प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदी घेण्यास सांगणे. वर्ग खोल्यांमध्ये वन्यजीव जैवविविधता या विषयीचे थोरांची वचने, काव्यपंक्ती, अवतरणे घोषवाक्ये लिहिणे,

 ● वन्यजीवांचे पोस्टर्स, कॅलेंडर इ वर्गात/शालेय परिसरात लावण.


• लहान वर्गात प्राणी, पक्षी यांचे मुखवटे तयार करून लावणे,

 • वन्यजीवाविषयी चित्र रेखाटन, मूर्तीकाम निबंध लेखन, पोस्टर्स स्पर्धा, प्रश्नमंजुषा आयोजित करणे.


● वन्यजीव जैवविविधता याविषयी प्रकल्प देणे. (उदा. प्राणी, पक्षी, फुलपाखरे, साप इत्यादीचे चित्र गोळा करून त्याची माहिती लिहिणे.)


● वर्गखोल्या तुकड्या / विद्यार्थी गट यांना प्राणी, पक्षी, फुलपाखरे, झाडे इ. नावे देणे, 

• TV. Computer, Laptop, LCD projector च्या मदतीने Discovery channel/CD/ YouTube


वर उपलब्ध असलेले वन्यजीव संरक्षण संवर्धन / मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजना विषयक चित्रपट, लघुपट, वन्यजीव अभ्यासकांचे व्याख्याने विद्यार्थ्यांना दाखवणे. 

● परिसरातील स्थानिक देशी वृक्षाच्या बिया संकलित करून एक छोटेखाणी रोपवाटिका तयार करणे.

शाळा व गावात प्राणी, पक्षी, फुलपाखरे व मधमाशा यांच्या आवडीची झाडे, वेली सपुष्प वनस्पती

लावणे. (जसे पिंपळ, पिंप्री, काटेसावर पळस पांगारा, आपटा, शिरीष इ)