डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
शापोआ मेनु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शापोआ मेनु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शापोआ नविन मेनु


शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील योजनेस पात्र शाळापैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचा शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर ई निविदा प्रक्रिया राबवून दिव्या एस. आर. जे फूड्स एलएलपी, जालना या संस्थेची निवड करून उक्त संस्थेसोबत संदर्भ क्र. २ अन्वये करारनामा करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक व Whole Wheat Flour, Refined Wheat Flour with Iron Enrichment, Sugar Powder, Edible Oil, Skimmed Milk Powder, Flavour and other essential ingredients 

असे इतर उपघटकांपासून तयार करण्यात आलेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करण्यात येणार आहे त्याकरीता शासकीय शाळांमध्ये असलेली पटसंख्या व इतर अनुषंगिक माहिती जिल्ह्याकडून संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे मागवण्यात आली होती. त्यानुसार शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्युट्रीटीव्ह स्लाईस उपलब्ध करून देण्याकरीता दिव्या एस.आर.जे फूड्स एलएलपी. जालना या संस्थेकडे मागणी नोंदवून पुरवठ्यापश्चात शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करणेबाबत आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
अ) न्यूट्रिटिव्ह स्लाईसची मागणी नोंदवणे व शाळा स्तरावर पुरवठा करणे..

१. शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नया, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांची पटसंख्या संदर्भ के ३ च्या पत्राद्वारे मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या पटसंख्येचा गोषवारा या सोबत परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आला आहे. उक्त गोषवाऱ्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात न्युट्रीटीव्ह

स्लाईसची मागणी नोंदविणे अनिवार्य राहील. २. प्रति विद्यार्थी वितरीत करावयाच्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे प्रमाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

प्रती विद्यार्थी मागणी व वितरणाचे प्रमाण
धान्यादी वस्तू           (किलोग्रॅम मध्ये) इ.१ली ते ५ वी१ न्यूट्रिटीव्ह स्लाईस- मुख्य घटक तांदूळ     

   इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.१२०

२ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक बाजरी ०.१२०

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

३ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक ज्वारी 

    इ.१ली ते ५ वी           ०.२४०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

४ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक नाचणी

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

५ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक सोयाबीन

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०


 वरीलप्रमाणे मुद्दा २ मध्ये नमूद केलेप्रमाणे न्यूट्रिटीव्ह स्लाईसची शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद,
मनपा, नपा, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांकरीता प्रति विद्यार्थी निश्चित केलेल्या प्रमाणात व संदर्भ ३ च्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार शाळानिहाय संकलित केलेल्या पटसंख्येनुसार न्युट्रीटीव्ह स्लाईसची मागणी इंग्रजीमध्ये एम एस एक्सेल (MS Excel) मध्ये जिल्हास्तरावरून तयार करायची आहे. सदर मागणीची एक प्रत पुरवठा  प्रतिनिधीकडे देऊन त्यांची पोहोच घेऊन सॉफ्ट कॉपी पुरवठादाराच्या treffbakers@gmail.com या ई मेल वर पाठवायची मागणीची एक प्रत संचालनालयास
ई-मेलद्वारे सादर करायची आहे,

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....