डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चांद्रयान ३ आकाशात यशस्वी झेपावले

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे.

 चांद्रयान-३ आपल्या पूर्वनिर्धारित वेळेनुसार २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रावर जाण्याचा प्रवासाला निघाले आहे.

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. चांद्रयान-३ च्या आधी भारताने चंद्रावर संशोधनासाठी दोन मोहिमा पार पाडल्या आहेत. भारताने २००८ साली पहिल्यांदा चांद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्यानंतर २०१९ ला चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. चांद्रयान-२ मध्ये विक्रम लँडरच्या हार्ड लँडिंगमुळे चांद्रयान-२ मोहीम यशस्वी होऊ शकली नव्हती.

त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यावेळी अनेक चाचण्यांनंतर लँडरच्या डिझाइनमध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरून यावेळी मोहिमेचे यश सुनिश्चित करता येईल. चांद्रयान-३ चंद्रावर पाठवण्यासाठी एलव्हीएम-३ लाँचरचा वापर केला जाईल. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर लँडिंग करणारा करणारा जगातील चौथा देश बनेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे.



५ वी पासूनच शेती विषय अभ्यासक्रमात

 महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवला जाणार आहे.



पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या निर्णयामुळं शेती सुधारेल पर्यायनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असेही सत्तार यांनी स्पष्ट केले .

शिक्षकांना मिळणार  प्रशिक्षण ... 

सरकारने विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवण्याचे नियोजन केलं आहे. शेतीचे धडे गिरवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावामध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार आहेत. शिक्षकांना देखील काही दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. बहुतेक मुलं मुली ही शेतकऱ्यांची असतात. ही मुले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाचं नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळं त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा यासाठी पाचवीपासून शेतीचा विषय शिकवला जाणार असल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे.

यासबंधीची सर्व माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवू. त्यांचे समाधान झाले तर ते सांगतील. शिक्षणमंत्र्यांशी देखील याबाबत बोलणे केले जाणार आहे. शिक्षणमंत्री यामध्ये शेती विषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय सांगतील असे सत्तार म्हणाले. याचा ढाचा आम्ही ठरवणार आहोत. पाचवी ते बारावीपर्यंत शेती विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. बेसिक विषय सोडून शेती विषय शिकवला जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सत्तार म्हणाले. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी विभागाची दोन लोक तसेच शिक्षण विभागाची दोन लोक अशी चार लोकांची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूनं अभ्यास करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.