डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Rte admission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Rte admission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

RTE च्या २६ हजारांहून जास्त जागा रिक्त; अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर नाही|rte-admission|

 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

यानंतरही अद्याप २६ हजार ८७० जागा रिक्त आहेत. चौथ्या प्रतीक्षा यादीनंतर प्रवेश प्रक्रिया थंडावली आहे.जागा रिक्त असूनही पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न झाल्याने पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

rte


आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविते. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार २४२ जागांसाठी दोन लाख ४२ हजार ५१६ अर्ज आले. ऑनलाइन सोडतीत ९३ हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग खुला करून देण्यात आला. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९' (RTE) नुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील निवड यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा मार्ग खुला झाला. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र जागा रिक्त असल्याने पालक अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

परंतु प्राथमिक शिक्षण विभागाने अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न कझाल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.



प्रवेशसाठी वय निश्चिती |rte admission age|

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.


शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई  शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. 

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18 / 9 / 2020 रोजीच्या वर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय



Rte प्रवेश आता नव्याने मुदतवाढ

 खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

    प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.



     या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ प्रवेशांच्या जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी तीन लाख ६४ हजार ४१३ बालकांच्या पालकांनी अर्ज केले. प्रवेशासाठीच्या सोडतीनंतर ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली. 

    १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू झाल्यापासूनच या प्रक्रियेत पालकांचा थंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन प्रकरणे १५ मेपर्यंत निकाली काढण्यात येणार आहे.