स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩
*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*
*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां सारेच गडकिल्ले....*
*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*
*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*
*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*
*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*
*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*
*ताठ उभा मराठी मुलख आजवर..*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*उभारला आदर्श...राज्य कल्याणकारी,*
*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*
*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*
*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*
*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*
*आई भवानीचा,मिळून आशीर्वाद ,*
*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*
*संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*
*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा झुकविलात,*
*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️
*औरंगाबाद*
9960878457