डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
birthday लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
birthday लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कल्याणीचा वाढदिवस साजरा होतोय....

 *कल्याणी शाळेतील गुणवंत विद्यार्थीनी , अभ्यासात सदैव तत्पर तिला वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐🎂🎂🎂*


           *यशवंत, कीर्तीवंत होशील बेटा सदैव अशीच जिद्द चिकाटी ठेवशील....*

*Happy Birthday Kalyani*


कल्याणीचा वाढदिवस साजरा होतोय....

कल्याणी ३ बहीण व १ भाऊ अशी ४ भावंडे कल्याणी ३ नंबरची तर भाऊ सर्वांत लहान....साहजिक लाड कुणाचे होत असणार हे आपण समजू शकतात. 

     कल्याणी एकपाठी व काहीही शिकवले तर तेव्हाच शिकणार अशी परफेक्ट विद्यार्थीनी.... 

       तिच्या भावाचे एकदा वाचन घेतांना... तो तितका अभ्यासात पुढे दिसला नाही पण हुशार असलेल्या कल्याणीला भावाचे असे मागे राहणे तिच्या चेहऱ्यावरचे दुःख  झलकून येत होते. 

      सहज मी विचारले याचा वाढदिवस कसा साजरा होतो. तेव्हा कल्याणी म्हटली *" दरवर्षी केक आणून साजरा होतो."* मग मी परत विचारले तुझ्या वाढदिवसाला आणतात का? तेव्हा तिचे नाही हे उत्तर मनाला शल्य आणून देणारे  होते ....😥आपोआपच डोळयाच्या कडा ओलावा धरुन अश्रू लपविण्यास सज्ज झाल्या . 

        मुलगा मुलगी ही विषमता किती अवघड आहे , हे लगेचच दृश्य  दिसून आले .कल्याणी ३ नंबरची मुलगी मग तिचे बालपण ते आजवरचे सर्वच चित्र माझ्या मनात उमटले.

      *"मी म्हटलो लाडोबाचा लाड आता बंद करायचा व आता तुझ्या वाढदिवसाला केक 🎂 आणून साजरा करायचा."*


दोन महिन्यानंतर कालच कल्याणीच्या आईचा फोन आला व त्या म्हटल्या उदया कल्याणीचा वाढदिवस आम्ही केक कापून साजरा करणार आहोत. हे शब्द एकून मन अगदी भारावून गेले. उशीरा का होईंना पण मुलीचा वाढदिवस त्या परिवारात आनंद व भेद मिटवणारा ठरणार आहे. 

         मुलांचा चेहरा वर्गात अनेकदा खूप काही सांगून जातो त्यास फक्त थोडसं बोलकं केल्यास निश्चितच त्याचे दुःख किंवा भाव पटकन तो बोलून जातो.      आपल्या समाजात लेकीच्या जन्मावर का ? आज ही चिंता केल्या जाते. का ? तर ती चितेला मुखअग्नी देऊ शकत नाही म्हणूनच का?

           वंशाचा दिवा दारूने प्रज्वलित होऊन आईबापांना लाथाडतो ती धन्यता म्हणून त्याचे पालन पोषण करायचे का?


*नक्कीच समाजातील ही विषमता संपावी .....*


*जन्म होता घरी लेकीचा,*
*होवो उत्सव  कुंटुंबाचा,*
*भेदभाव नको मुलामुलीचा,*
*स्वागत होवो तिच्या आगमनाचा...*    *प्रकाशसिंग राजपूत*

          *सहशिक्षक*

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,

ता.जि.औरंगाबाद 

     9960878457