डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
digital portal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
digital portal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....

 आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....


जगभरात आलेले संकट हे खरंच आव्हानात्मक आहे. भारत देश विकसनशील राष्ट्र असून आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या संमातर बाबी आहेत. पण अशा परिस्थितीत दोन्हीही संकटात आहे. 

       शिक्षण व्यवस्थेत आपण कधीच या परिस्थितीचा विचार केलेला नाही. एकवेळ आरोग्य साधने आपण लवकर निर्मित करुन उभारणी करु शकतो ,परंतु  शिक्षणात असे करणे आवाहनात्मक असणार आहे.

       तरी पण सोशल मिडिया व डिजिटल साधने सर्वत्र पसरले असल्याने आपण बहुतांशी कार्य किंवा  शैक्षणिक आव्हान पेलु शकतो.माञ १००% प्राप्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल .




       आपली शिक्षण पद्धती  ही आजवर शाळा व शिक्षण या स्वरुपातच बंधिस्त राहीलेली आहे. 

शाळेतच शिक्षण होईल याच पद्धतीने आपण राहीलो आहे त्यामुळे पण अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून लांब झालेले दिसतात. शिक्षक हा गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने कार्य करत आलेला आहे. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर शिक्षण प्रवास सुरु होतो तर पुढे त्याची शैक्षणिक प्रगती व आर्थिक परिस्थिती यावर त्याचे शिक्षण कसे होईल हे अवलंबून असते.साधारणतः हीच परिस्थिती  पुढे त्याला त्याच्या क्षमतेचा, कौशल्याचा व आवडीचा विचार न करत वाहत नेत असते. 

         कोरोना विषाणूने आलेला आजार एकूणच संपुर्ण शिक्षण प्रवाहाला थांबवून टाकतोय, खरं तर अशा परिस्थितीचा कोणत्याही शैक्षणिक धोरणात किंवा अभ्यासक्रम निर्मितीत विचार केलेला नाही. त्यामूळे आज समोर येऊन ठेपलेला हा कोरोना राक्षस आपल्या शैक्षणिक प्रगतीला थांबवून मागे आणू शकतो. आपण पुस्तक छापायचे व तोच अभ्यास विद्यार्थ्यांनी आत्मसात करत त्या आधारे गुणवत्ता तपासणी करायची हे ही त्या विद्यार्थ्यांची आवड किंवा अभिरुची न बघता. पुस्तकात बंद असलेले ज्ञान हेच त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार.

     गेल्या काही दिवसात दिक्षा अँप निर्मिती झाली व पुस्तकात क्यु आर कोडचा समावेश झाला व आपली पुस्तके छपाई सह डिजिटल स्वरूपात बनु शकली आहे.

        *डिजिटल व आँनलाईन शिक्षण स्वरूप*

📄 डी.एड /बी.एड शिक्षणात आदर्श पाठ सादरीकरण केल्या जाते ,त्याचप्रमाणे पाठयघटकातील प्रत्येक प्रकरणाचे आदर्श अध्यापनाचे व्हिडीओ जर पुस्तकात क्यु आर कोड स्वरुपात करण्यात आले तर फक्त अशा संकटातच नव्हे तर अनेकदा विद्यार्थी आजारपणाने गैरहजर राहीला किंवा पालकांचे अंशकालीन स्थलांतर होत असेल तर या नविन पद्धतीने त्या घटकांचे ज्ञान प्राप्त करु शकेल. व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे अध्यापन सहज उपलब्ध होईल. पाठयक्रम रचना करतांना संबंधित अभ्यासगट अथवा राज्यातील विद्या प्राधिकरण यामार्फत १००% आदर्श पाठ त्या संपुर्ण घटकांचे बनवत क्यु आर कोडच्या साहाय्याने समाविष्ट करणे खूप हिताचे ठरेल.




🌐 बालक - पालक या स्वरूपात  व्हाटसअप समूह अथवा ब्राँडकास्ट लिस्ट बनवून एकञित इ कन्टेट देवाण घेवाण करणे.

▶️ अध्ययन निष्पती आधारित व्हिडीओंचे संकलन इयत्ता निहाय करत ते विद्यार्थ्यांना अध्ययन करिता नियोजनबद्ध पोहोच करणे.


📲दिक्षा अँपचे नियोजनबद्ध वापर तसेच अनेक शैक्षणिक  बोलो अँप, खुट इ. प्रभावी वापर करणे.


📲   क्लाऊड मिटींग, झुम अँप किंवा स्कायपी गुगल मीट या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी व्हिडीओ काँन्फरिंग करत अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतीमान करणे.


🧾 आँनलाईन टेस्टचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी प्राप्त क्षमतेचे मुल्यमापन करत आवश्यक असलेले अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करत वरील माध्यमातून तयारी करणे.

📱 मोबाईल एस.एम.एस पद्धतीने ज्यांच्याकडे अँण्ड्राईड किंवा मल्टिमिडिया फोन नाहीत अशा विद्यार्थ्यांना अध्ययन स्वरूप समजावत स्वयंअध्ययनास प्रवृत्त करत लघुत्तम कन्टेट एस एम एस द्वारे पाठवणे.

📱आँडीओ काँन्फरस काँल माध्यमातून शिक्षक एकञित सुचना अथवा श्राव्य अध्यापन ही शक्य होऊ शकते.

या सर्व क्रिया जलद होण्यात काही अडचणी आहेत त्या म्हणजे ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन नसणे, मोबाईल नेटवर्क जलद नसणे, नेटवर्क असले तरी महागडे इंटरनेट पँक, पालकांचा विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यातील उदासिनता.

       याबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेत शाळा, तालुका व जिल्हा समन्वय राहण्यासाठी  शिक्षक बहुतांशी तंञस्नेही नसल्याने निर्माण होणारी अडचण, तथा पालकांचे पुर्ण सहकार्य या सर्व गोष्टी  आँनलाईन व डिजिटल शिक्षण यावर प्रभाव टाकणारे आहेत.


     *प्रकाशसिंग राजपूत*

          सहशिक्षक 

जि.प.प्रा,शा.मुरुमखेडावाडी

  


    आँनलाईन व डिजिटल शिक्षण - तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे.


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021 #awardnomination #awards

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम 


मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.


महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. 21,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उपरोक्त दोन्ही क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. 

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2021 अखेरीस 35 वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले - 9860740569 या क्रमांकावर अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे व युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

युवा सामाजिक पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/7ayCo2bEobyjjYUM7

युवा क्रीडा पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/n5AaqFdVXNZ4MtJp9

आजादी का अमृत महोत्सव Azadi ka....




आजादी का अमृत महोत्सव 

  आझादी का अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध उपक्रम व स्पर्धा यांनी साजरा करणेबाबत.
आजादी का अमृत महोत्सव एका दृष्टिक्षेपात...


✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *१२ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३* या दरम्यान साजरा करण्यात येत आहे .

✍️केंद्र शासनाचा सर्वात महत्त्वकांक्षी कार्यक्रम.

✍️राज्याच्या  पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव *१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत* जिल्हास्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे निर्देश.

✍️हा अमृत महोत्सव भारताचा स्वातंत्र्य संग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती, अंमलबजावणी या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करणे अपेक्षित.

✍️जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापकाचार्य, आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हास्तर यावर आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी होणे अपेक्षित.

 ✍️संपूर्णतः Non budgetary असा हा कार्यक्रम.

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.


 *जिल्हा स्तरावर करावयाची कार्यवाही-* 


✍️जिल्हास्तरावर फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कला क्रीडा विभागाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासाठी प्रत्येक डायटनिहाय एक समन्वयक अधिकारी, कला व क्रीडा विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सदर समन्वयक अधिकारी यांचे नाव https://tinyurl.com/activityreport1   या लिंक वर नमूद करण्यात यावे.


http://bit.ly/3HDVOA3

✍️ सदर समन्वयक अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची  दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्थ तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे .यासंदर्भात आवश्यक पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयास arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल वर सादर करावी.


आजादी का अमृत महोत्सव  

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक  तालुका स्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी दरमहा तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबधित विषय साधन व्यक्ती यांच्याकडून जिल्हास्तर यावर  संकलित करावा. आणि हा संकलित अहवाल

  https://tinyurl.com/activityreport1

या लिंक वर दर महिना अखेरीस भरण्यात यावा.दरमहा अहवाल नियमितपणे भरण्याची जबाबदारी डायट जिल्हा समन्वयक यांची असेल.

✍️ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नाही,हे विचारात घेऊन Non budgetary activities चा समावेश करण्यात आला आहे,याची नोंद घ्यावी.त्यामुळे खर्चिक उपक्रमांचा समावेश करण्यात येवू नये .

✍️ज्या स्पर्धा या अंतर्गत राबवल्या जातील ,त्या स्पर्धेतील विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावे .

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.तसेच वेळापत्रकातील स्पर्धा  नियोजित महिन्याच्या कोणत्याही तारखेला घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा समन्वयक अधिकारी यांना असेल.

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रमांची  समाजमाध्यम याद्वारे जसे facebook, twitter,Instragram,whats app याद्वारे  व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी .या पोस्टची लिंक  अहवाल लेखनात नमूद करावी .

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत उपक्रमआयोजन,नियोजन,अंमलबजावणी व सनियंत्रण  यांची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल तर प्रशासकीय समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक ) यांची महत्वाची जबाबदारी असेल.


मोफत.... मोफत..... उन्हाळी सुट्टीत डिजिटल शिक्षण Free e content #free class, #join class

👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫
   


 डिजिटल शिक्षण आता सर्वांसाठी....

मोफत ....मोफत डिजिटल शिक्षण .....
या चॕनलला सबस्क्राईब करा...... आजीवन  सदस्य रहा 850 पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडीओ...... महाराष्ट्रात प्रथमच ...... डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र चा भव्य  दिव्य उपक्रम .....करोना काळात 13 लक्ष विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरलेला आहे.


               मोफत सबस्क्राईब करा

               Subscribe Now

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडणारे हे ई कन्टेट नक्कीच अध्ययन क्षती भरून काढणार....इयत्ता निहाय खालील टॕबवर क्लिक करा....





*📲स्मार्ट डिजिटल शिक्षण ....💾*

*१ ली ते ८ वी वर्गाचा अभ्यास 

पाठवित आहोत ज्यामूळे विविध घटकाचे  विद्यार्थ्यांना अध्ययनास मदत होईल.*
                       🟥इयत्ता  १ ली*🟧     


  

================================================================

🟧 *इयत्ता २ री🟥*


   


  
================================================================

🟥इयत्ता ३ री🟧*



  

  ================================================================


🟥इयत्ता ४ थी🟧*



  
================================================================    


🟧इयत्ता ५ वी 🟥*




  
  ================================================================


 🟥इयत्ता ६ वी 🟧*




  
  ================================================================


🟥इयत्ता ७ वी🟧*




  
  ================================================================

🟥इयत्ता ८ वी🟧*




  
  ================================================================ 

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Zp शाळेच्या मुलांची डिजिटल  शाळा सुरु....*

*ज्ञानाची शिदोरी अवश्य विद्यार्थ्यांना पाठवा...Share for care*

Mahastudent डिजिटल हजेरी #student attendance



महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्याथ्र्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGi (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent अॕपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.




 MahaStudent हे अॕप विकसित करण्यात आले आहे. सदर अॕप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. खालील लिंकवरून डाऊनलोड करा...



या अॕप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर अॕप मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही अॕपचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.


राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती MahaStudent अॕपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात  आलेली आहे.