डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
how to register लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
how to register लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजपासून बुस्टर डोस मिळणार..... पहा आवश्यक माहिती #booster dose, how to register,

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात होत आहे.



सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

   बूस्टर डोस कुणाला मिळणार आहे ?

10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.       

बुस्टर डोसचे कुठले मार्गदर्शक तत्त्वे?

कोविड-19 लसीच्या बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला आहे. असे केंद्र सरकारने   सांगितले होते.


बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची?

बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.

CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता असणार  का?

देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.


लस कुठं मिळणार?

पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. मात्र हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॕपवरच मिळू शकणार आहे. तिसऱा डोस घेतल्यानंतर, त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.

वृद्ध व्यक्तींना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डोस कसा घ्यायचा?

ज्या 60 वर्षावरील व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या 22 व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.