डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
old age home लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
old age home लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.
     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....