डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
seventh pay लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
seventh pay लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जाणून घेऊया आश्वासित प्रगती योजना.... #Seventh pay

 आश्वासित प्रगती योजना


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या (१०, २० व ३० वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी) सुधारीत सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजनादिनांक ०१/०१/२०१६ पासून अस्तिवात आलेली आहे.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२/०३/२०१९ नुसार सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. 


सदरची योजना दिनांक ०१/०१/२०१६ पासून अंमलात आली आहे. सातव्या वेतन आयोगातील वेतन स्तर एस-२० पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील.


 या योजनेतील पात्र अधिकारी / कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत पात्रतेनुसार तीन वेळा लाभ मंजूर होईल, जर कार्यात्मक दोन वेळा पदोन्नत्या मिळाल्या असतील तर या योजनेत एकच लाभ अनुज्ञेय होईल. 

जे अधिकारी / कर्मचारी दिनांक ०१/०१/२०१६ पूर्वीच शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत/ मृत्यू पावले आहेत त्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. जरी दि. ०१/०१/२०१६ पूर्वी या योजनेच्या लाभास अधिकारी/ कर्मचारी पात्र ठरत असले तरी, दिनांक ०१/०१/२०१६ पासूनच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.