डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
short film लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
short film लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू... #unicef covid

 राष्ट्रीय स्तरावरील आयोजित स्पर्धेत...

 जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी , केंद्र / बीट करमाड , ता/ जि. औरंगाबाद  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना या संकटापासून वाडीला वाचविण्यासाठी शोधलेला हा उपाय खूपच महत्त्वाचा व वाडीच्या लोकांना आरोग्य व स्वच्छतेचा संदेश देणारा ठरणार आहे. जगभरामध्ये पसरलेल्या करणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . लोकांचा बाहेर जाणे येणे  थांबवता येत नाही. पण घरी येताना त्यांनी जर स्वच्छतेची काळजी घेतली तर निश्चित या संकटापासून वाचण्यासाठी पूरक असा उपक्रम मुरूमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे .त्यांना या कामासाठी शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलेले आहे.वर स्टोरी पहा 

 शालेय जीवनात मुलांना मिळालेला हा अनुभव पुढील आयुष्यामध्ये त्यांना निश्चितच आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. समाजाविषयी एक नागरिक म्हणून आपले काय देणे असते याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांना टाळता येते याची जाणीव सुद्धा त्यांना यामुळे होणार आहे. हे करत असतांना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस याबाबतीत विचार करण्यास सुरुवात केली त्यांना मुख्यतः खालील समस्या या सतावत होत्या.
१) लोक वारंवार बाहेरगावी जातात.
२) हात पाय न धुता तसेच घरात येतात.
३) लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
४) डोंगर खोर्‍यात वाडी असल्याने सुरक्षित आहे पण सतत जाणारे-येणारे धोका वाढवीत आहे.

       या सर्व समस्यांवर विचार करत त्यांनी *🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू...*

    या उपक्रमाची स्वतः आखणी केली . वाडीतील मोठया मुलांच्या सहकार्याने वाडीत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्यांनी शाळेसमोर हात पाय धुण्यासाठी नळ व वटा निर्माण केला व तेथे हँण्डवाँश लिक्विड उपलब्ध करुन दिले. 

             एक प्रकारचा थांबा निर्माण करत लोकांना बाहेरून येतांना हात पाय धुवून वाडीत येण्याविषयी प्रबोधन केले व हात धुण्याची योग्य पद्धत ही समजावली.

       "small things make big change"

       याप्रमाणे या उपक्रमाचा फायदा खालीलप्रमाणे होणार आहे.

१) लोक बाहेरून येतांना हात पाय स्वच्छ करुन येणार असल्याने कुटूंबाला तसेच पर्यायाने समाजाचा कोरोना पासून बचाव होणार आहे.

२) हात धुण्याची योग्य पद्धत ही लोकांना माहित होणार आहे.

३) जेव्हा शाळा उघडातील तेव्हा शाळेत येतांना व शाळेतून जातांना विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.


           *विद्यार्थी सहभागी टीम*


जयपाल बालोद,पार्थ बचाटे,  साक्षी बचाटे , कल्याणी बचाटे, सागर बालोद, प्रतिक्षा बचाटे.*

                *मार्गदर्शक*

        *प्रकाशसिंग राजपूत*

            

               *सहकार्य*

    *श्री दिलीप आढे*

*अर्जून बालोद व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य*


Share for care....

▶️ *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🎞️