डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
song shivaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
song shivaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिवराय..... राजं हे दैवत ....नविन गीत...

 स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩





*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*


*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां सारेच गडकिल्ले....*

*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*

*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*


*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*

*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*

*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*

*ताठ उभा मराठी मुलख  आजवर..*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*उभारला आदर्श...राज्य  कल्याणकारी,*

*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*

*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*

*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*

*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*

*आई भवानीचा,मिळून  आशीर्वाद ,*

*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*

 *संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*

*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा  झुकविलात,*

*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


   *✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️

           *औरंगाबाद*

         9960878457