डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जागतिक हात धुवा दिवस..

 हात धुण्‍याचा शोध....इतिहास 


"स्वच्छ धुवून वारंवार हात...
       रोगांची येणार नाही साथ..."


    जगात हात धुण्याचे महत्त्व करोनानंतर नक्कीच सर्वत्र पटलेले आहे. परंतु याबाबतीत जगात नेमकी केव्हा कशी ओळख झाली हे पाहणे आपल्यासाठी रंजकदार होणार आहे.
      युरोपमध्‍ये सन इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
     हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे.

हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू...




       आमच्या मुरुमखेडावाडी शाळेने सन २०२० मध्ये तर करोना परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन फॉर चेंज अंतर्गत शाळेच्या समोर वाडीच्या लोकांना बाहेरून आल्यावर हात धुण्यासाठी व्यवस्था केली व हात धुण्याबाबतीत सतत प्रात्यक्षिक ही दिले. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दिड वर्षात करोना वाडीत आलेला नाही.


पुष्‍कळ लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. हात धुण्‍याचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखे ही स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात धूवून घ्‍यावेत.
   

१५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस


हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
       
खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे
दुषित पाणी किवा अन्नातून ,आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास...अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास अनेक सुक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच फुफ्फुस्, यकृताचे  आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
               
या रोगांचा प्रसार रोखता येतो  तो म्हणजे नियमित स्वच्छ हात धुवून


   
    स्वच्छ हात धुण्याची पद्धत
१)प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी.   
२) हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा.

३)दोन बोटांमधील बेचक्या तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी.
४)हात धुतांना साबण कमीत कमी 20 सेकंदापर्येत ठेवणे आवश्यक आहे.
५)हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
       
          हात कितीवेळा व कधी धुवावे...




दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी
शौचालयाचा वापर केल्यानंतर
पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर
सापसफाई केल्यानंतर
आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर
बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर

हात धुण्यासाठी निश्चित संख्या नाही फक्त ती एक सवय व्हावी जेणेकरून आजारांना आळा बसून येईल.

       प्रकाशसिंग राजपूत
          औरंगाबाद 


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

Self learning kids....१ ली व २ री ला उपयुक्त अॕप

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

डिजिटल समूहाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख व टीम डिजिटलचे तंत्रस्नेही श्री प्रकाश चव्हाण सरांची उपयुक्त निर्मिती आॕफलाईन  अॕप 📲....


नमस्कार मित्रांनो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी इयत्ता पहिली दुसरी आणि बालवाडीची विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण देण्यासाठी घेऊन आहे एक नाविन्यपूर्ण अँप Self_Learning_Kids*

 ॲप इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*


 *याची वैशिष्ट्ये म्हणजे*
 *हे ॲप एकदा डाऊनलोड केल्यानंतर पूर्णपणे ऑफलाईन चालते*

 *ॲप वर एकही जाहिरात येत नाही म्हणजे मुलांना जाहिरातीचा अर्थ अजिबात पाहिलेला नाही.*


*

 *तिन्ही विषयांची प्राथमिक ज्ञान म्हणजे मुळाक्षरे अंकज्ञान मराठी व इंग्रजी याची ओळख या ठिकाणी करून देण्यात आलेली असून प्रत्येक अक्षर कशा पद्धतीने लेखन करावे याचे ट्रेसिंग ट्रॅक चित्रात दाखवलेले आहेत त्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या बोटाने तिथं सहज लिहू शकणार आहे आणि खोडून परत  पुन्हा नवीन अक्षर तो लिहू शकणार आहे प्रत्येक अक्षराने सुरू होणारे शब्दांचा परिचय दिलेला असून त्या शब्दावर त्यांनी प्रेस केल्यावर त्या शब्दांचा उच्चार त्याला ऐकता येणार आहे*
 *हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते एस फाउंडेशनच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रकाशित झाले होते व आजच ते प्ले स्टोअर वर सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे.




*सर्वांना विनंती आहे की आपल्या गावातील अंगणवाडी ताई आणि पहिली दुसरीच्या शिक्षक पालकांपर्यंत हे ॲप सेंड करूम मुलांना डिजिटल पद्धतीने ऑफलाइन शिक्षणासाठी देण्यात आलेल्या पर्यायाचा आपण लाभ घ्यावा.*
🙏🌹🌹🌹🌹🙏
 *श्री प्रकाश लोटन चव्हाण* *National ICT Awardee 2019*
  
नवरात्री व दसरा उत्सवच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
      *प्रकाशसिंग राजपूत*
           *समूहनिर्माता*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*एकमेव शाळाकेंद्रित १०१ राज्यस्तरीय समूह....*


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

राज्यात 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू शासनाचे परिपत्रक पहा...

२०२० पासून राज्यातील सर्वच महाविद्यालय बंद होती राज्य शासनाने कोविडचे रूग्ण कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने शाळा व आता महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

          राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील कोव्हिड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोव्हिङ प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. सबब, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सरकारी परिपत्रकानुसार....

१. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, विद्यापीठ/महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. ज्यांनी कोव्हिड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. विद्यार्थी/विद्यार्थीनी

२.विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

      अधिक माहिती करिता खालील परिपत्रक वाचा....


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....