डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्यात 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू शासनाचे परिपत्रक पहा...

२०२० पासून राज्यातील सर्वच महाविद्यालय बंद होती राज्य शासनाने कोविडचे रूग्ण कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने शाळा व आता महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

          राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील कोव्हिड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोव्हिङ प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. सबब, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सरकारी परिपत्रकानुसार....

१. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, विद्यापीठ/महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. ज्यांनी कोव्हिड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. विद्यार्थी/विद्यार्थीनी

२.विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

      अधिक माहिती करिता खालील परिपत्रक वाचा....


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: