डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आता व्हाटसअप तुमचे आरोग्याचे संरक्षण करणार #whatsup

 स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली ....


या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या काही क्लिकमध्ये विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ते व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पॉलिसीसाठी क्लेम देखील करता येणार आहे. 



कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने त्यांच्या ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना सुरक्षित ठेवणे हे या मागचे उद्दिष्ट्य आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्टार हेल्थचे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एंड-टू-एंड सेवेचा लाभ घेऊ शकतात. स्टार हेल्थ रिटेल हेल्थ, ग्रुप हेल्थ, पर्सनल अ‍ॅक्सिडेंट आणि परदेश प्रवासासाठी विमा संरक्षण देते. भारतीय आरोग्य विमा बाजारात या कंपनीचा वाटा 15.8 टक्के आहे. 


कंपनीने सांगितले की, नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्टार हेल्थच्या ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून +91 95976 52225 वर 'Hi' असा मेसेज पाठवावा लागेल.

सौम्य लक्षणे असल्यास असे होणार विलगीकरण click here..

या सेवेच्या मदतीने ग्राहक नवीन पॉलिसी घेऊ शकतात. तुम्ही कॅशलेस क्लेम देखील दाखल करू शकता. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पॉलिसी डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतात. याशिवाय या कंपनीचे ग्राहक चॅट असिस्टंट-ट्विंकल, कस्टमर केअर क्रमांक, एजंट, अधिकृत वेबसाइट, ब्रांच ऑफिस आणि स्टार पॉवर अॅपच्या माध्यमातून वीमाकर्त्यापर्यंत पोहचू शकतात.

या सुविधांचा वापर करून ग्राहक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकतात. 

लवकरच Cbse टर्म १ चा निकाल... #Cbse result, exam,

 सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. 

केरोना पार्श्वभूमीवर बोर्डाने १० वी आणि "  वीच्या अभ्यासक्रमाची ५०-५० टक्के विभागणी केलेली होती. टर्म १ परीक्षा ५० टक्के अभ्यासक्रमासह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली आहे.



 परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आलेले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. अधिकृत माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर होऊ शकतो.

सीबीएसईने यापुर्वी निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे.

रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्नबाबत

 महत्त्वाचे म्हणजे रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत. त्यामुळे आता सी.बी.एस.ई. टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



आजपासून बुस्टर डोस मिळणार..... पहा आवश्यक माहिती #booster dose, how to register,

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात होत आहे.



सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

   बूस्टर डोस कुणाला मिळणार आहे ?

10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.       

बुस्टर डोसचे कुठले मार्गदर्शक तत्त्वे?

कोविड-19 लसीच्या बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला आहे. असे केंद्र सरकारने   सांगितले होते.


बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची?

बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.

CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता असणार  का?

देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.


लस कुठं मिळणार?

पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. मात्र हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॕपवरच मिळू शकणार आहे. तिसऱा डोस घेतल्यानंतर, त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.

वृद्ध व्यक्तींना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डोस कसा घ्यायचा?

ज्या 60 वर्षावरील व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या 22 व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.