सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे.
केरोना पार्श्वभूमीवर बोर्डाने १० वी आणि " वीच्या अभ्यासक्रमाची ५०-५० टक्के विभागणी केलेली होती. टर्म १ परीक्षा ५० टक्के अभ्यासक्रमासह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली आहे.
परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आलेले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. अधिकृत माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर होऊ शकतो.
सीबीएसईने यापुर्वी निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे.
रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्नबाबत
महत्त्वाचे म्हणजे रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत. त्यामुळे आता सी.बी.एस.ई. टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.