संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.
इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....
संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.
इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....
*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*
*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां सारेच गडकिल्ले....*
*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*
*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*
*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*
*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*
*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*
*ताठ उभा मराठी मुलख आजवर..*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*उभारला आदर्श...राज्य कल्याणकारी,*
*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*
*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*
*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*
*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*
*आई भवानीचा,मिळून आशीर्वाद ,*
*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*
*संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*
*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा झुकविलात,*
*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*
( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*
*तीर्थ हे आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)
*✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️
*औरंगाबाद*
9960878457
शिक्षक भरतीसाठी (teachers appointment ) उमेदवारांना 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली.
त्याचवर्षी ही परीक्षा (examination) झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२' एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) सांगण्यात आले आहे.
त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे.
प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी अनेकजण मागणी करत आहेत.