डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एप्रिलमध्ये होणार 'शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२२'

 एप्रिलमध्ये होणार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२

शिक्षक भरतीसाठी (teachers appointment )  उमेदवारांना 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली. 

                         

त्याचवर्षी ही परीक्षा (examination)  झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. 



शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२' एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) सांगण्यात आले आहे.

 त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. 

प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी अनेकजण मागणी  करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: