डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

१० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

 पुणे – नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका (question papers)  घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली.



दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली असून ‘द बर्निंग’ टेम्पो थरार येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत हे टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ मधून भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे टेम्पो चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर आला असता पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.

मनीष चौरसिया व रामविलास राजपूत यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  घटनास्थळी दाखल झाले. 

त्यापाठोपाठ संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या टेम्पोला आग लागल्याचे समजताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार....

 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.



 नवीन पेन्शन योजना, रिक्त पदे तातडीने भरणे यासह अन्य मागण्यांविरोधात सरकारी कर्मचारी संप करत असल्याचे समोर आले आहे.

कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने उदासीन राहिल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी दिला.


 शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.


 यापूर्वी 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 रोजी तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर या आंदोलनानंतर सातवा वेतन आयोग लागू झाला.  मात्र, इतर विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.


 त्यामुळे राज्य सरकारने जानेवारी 2019 मध्ये वित्त राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती.  या समितीच्या काही बैठका झाल्या.  परंतु नवीन पेन्शन धोरण रद्द करायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.


 केंद्र सरकारने, यथास्थिती, राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे.  याबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला.  त्यामुळे त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


 इतर प्रलंबित मागण्या


 बक्षी समितीचा दुसरा खंड प्रकाशित व्हावा


 केंद्र सरकारनुसार सर्व भत्ते द्या आणि सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरा


 बिनशर्त अनुकंपा नियुक्तीसाठी योजना तयार करा


 सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत हे उपक्रम होणार ....



शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार....





 दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रा संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. 

त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत....

 शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे,

 वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, 

विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे.

 या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत .


●खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे


अ. शालेय स्तरावर विद्यार्थ्यासाठी आयोजित करावयाचे उपक्रम

या फोटो अपलोड करावा. वैज्ञानिक रांगोळी दिलेल्या विज्ञानातील संकल्पना विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.



इयत्ता पहिली ते पाचवी


१. चित्रकला २. पोस्टर निर्मिती


१. माझी पृथ्वी. २. परिसरातील मित्र/सोबती.


चित्रकला / पोस्टर निर्मिती:


दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र /

पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार . 


निबंधलेखन:- 


इयत्ता सहावी ते आठवी


१. निबंध लेखन 

२. वैज्ञानिक रांगोळ्या


१. स्वयंपाकघरातील विज्ञान.



२. भविष्यातील दळणवळण.


३. माझी शाश्वत जीवनशैली. 

४. विज्ञानातील संकल्पना,


इयत्ता नववी व अकरावी


१. निबंध लेखन 

२. फोटोग्राफी/ व्हिडिओनिर्मिती



निबंध लेखन विषय :

१. माझा आवडता संशोधक.

२. भविष्यवेधी विज्ञान 

३. विज्ञानातील सफर.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन


दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. फोटोग्राफी/व्हिडिओ निर्मिती : गमतीजमती. दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ 


प्राथमिक,

१. वैज्ञानिक

१. समाजोपयोगी विज्ञान

 २. शाश्वत विकास


वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक | प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची लिहून त्याचा फो |व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.


प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी


१) प्रतिकृती निर्मिती 


२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती