डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शाळा प्रवेश वयात बदल जाणून घ्या...#school,

 नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय किती असावं हा काही गेल्या वर्षांपासून चाललेला घोळ अखेर सरकारने मिटवला आहे. 




शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी (school admission)  बालकांचे किमान वय(age) किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आलं आहे. 


यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने, ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने, सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे.



याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता बदल करण्यात आला आहे.

जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. 

त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.

आधार आधारित संच मान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन...

 सन २०२१ -२०२२ चे शिक्षक समायोजन हे आता संच मान्यता आधारित तेही सरल पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार आहे.



 पोर्टलवर (portal) विद्यार्थ्याचे आधार (adhar) नोंद क्रमांक नोदणी करणे करिता दि. ३१.०३.२०२२ पर्यत मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करिता करावयाच्या योग्य त्या उपाययोजना आयुक्त (शिक्षण) यांनी निश्चित कराव्यात व त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश आले आहेत. 

यानंतरच दि. ३१.०३.२०२२ अखेर सरल पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन २०२१-२०२२ ची संच मान्यता दि. १५.०४.२०२२ पर्यत अंतिम करण्यात यावी.


सदर अंतिम संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही दि. ३१.०५.२०२२ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. वरील प्रमाणे आवश्यक सूचना तातडीने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी व शाळाव्यवस्थापक/मुख्याध्यापक यांच्या निर्दशनास आणून त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी असेही आदेशात म्हटलेले आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाल...

 ई-श्रम कार्ड पोर्टल




असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.


एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.

पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.

मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other details वर क्लिक करायचं आहे.

आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yes नसाल तर no वर टिक करायचं आहे.

त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.

त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.