डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शाळा प्रवेश वयात बदल जाणून घ्या...#school,

 नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय किती असावं हा काही गेल्या वर्षांपासून चाललेला घोळ अखेर सरकारने मिटवला आहे. 




शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी (school admission)  बालकांचे किमान वय(age) किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आलं आहे. 


यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने, ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने, सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे.



याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता बदल करण्यात आला आहे.

जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. 

त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.

1 टिप्पणी:

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

2022-2023नुसार पहिली ते दहावी सलग शिकणारे लेकरं अकरावी आधीच अठरा वर्षे वयाचे होतील, दुर्दैवाने एखाद्याचे बेरोजगार आई किंवा वडील वारले,नंतर सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय असे पालक असलेतरी दहावी बारावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी ही रजा नाहीत तेही पालक देवाघरी गेले तर अठरा वयात बारावी उत्तीर्ण ही नाही, मायबाप मयत ,ते अनाथ निराधार तरी तज्ज्ञमते सक्षम म्हणून आयुष्यभर पेन्शन ही नाही, अनुकंपा त तात्काळ नोकरी तीस किमी आत दोन लेकरांना नाही, सिंगल पॅरेंट ला आयकर सूट प्रवास भत्ता, मुख्यालयी राहण्यापासून सूट नाही.मतदान अठरात मग विवाह बाबत एकवीस बाबत विचार का?हे जोडीदार ची पेन्शन न घेणारे, पेन्शन योजना लागू करण्यात आली तेव्हा नोकरी त लागलेहोते म्हणून आयुष्यभर शाळांचे लेकरं गुणवंत केले म्हणून पेन्शन पात्र पण जोडीदार मयत म्हणून जी जोडीदाराला दिली असती तीच पेन्शन आयुष्यभर विभागून एकदा एक कर्मचारी एकदा पेन्शन आयुष्यभर यांना असावी.एका लेकरासाठी दोघे शिक्षक आई-वडील सिटी अलाउन्ससह शहरात दहा-वीस वर्ष कला क्रीडा विशेष शिक्षक, एक खाजगी संस्था एक जिल्हा बदली वाले असेकाही असलेतर लाभ नियमांनी घेतात द्या,पण पालक जिवंत व मयत यात खूप फरक आहे.महिला दिनी गोडवे सारे, महिला पालक मयत तर विधुर बापही पहा बिचारे.. विधवा विधुर दोघांना समान न्याय असावा.पदोन्नती स्वतंत्र यादी असावी.कोरोनाकाळात मयत अपंग बेरोजगार जोडीदार माजी सैनिक पालक यांच्या वारसांना दहावी बारावी पीस माफ हवी.खेळाचे तलवारबाजी इ.राज्यस्तरीय नोंद करून घ्यावी.पहिलीवय नवोदय शिष्यवृत्ती एसपीआय, क्रीडा जाहिराती एमपीएससी पोलिस भरती मिल्ट्री नेव्हीते हयात प्रमाणपत्र सगळीकडे एकच मानीव दिनांक असावी एकाच बॅचचे बरेच लेकरं वंचित राहतात, कौटुंबिक परिस्थिती पाहून जगण्यापुरता न्याय द्यावा, पहिली पासून निदान गणवेष तरी सर्वांना मिळावे.शाळा व्यवस्थापन समिती सही दोन अपत्य अट असावी. अपंगबेरोजगार पॅरेंट, सिंगल पॅरेंट, यांना उत्पन्न अट न ठेवता पिवळे रेशनकार्ड ने निदान आरोग्य सेवा व धान्य तरी मिळावे आई-बाप जिवंत कमवते तरी विशेष लेकरू तर सव्वा लाख रुपये आयकर सूट आहे बालसंगोपन रजा विशेष क्रीडा रजा आहेत.पदोन्नतीत अपंग कर्मचारी मग अपंग जोडीदार मग एकवीस अपंग प्रकारक्रमाने अपंग लेकराचे पालक हवे.मी कर्मचारी पण अपंग नाही पती अपंग पण कर्मचारी नव्हते म्हणून दोघेही वंचित कायम..शिलाई मशीन ही नाही मिळाली कधी..ना व्यवसाय कर सूट अपंग पतीचे पालक म्हणून ना बालसंगोपन रजा दोन्ही लेकरं लहान पती अपघाताने दोन्ही पायांनी कायमचे अपंग तरी.. मेरिट गुणांवर शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून नियमित पूर्णवेळ बीएड केंद्रीय सीईटी ने सात वर्षे सेवा नोंद करून ती285दिवस बिनपगारी रजा लागली तेथील उपस्थितीपत्र जोडलेतरी एक वेतनवाढ सहाव्या वेतन आयोगाने गेली..आता विधवा आयकर भरतात, नवोदय शिष्यवृत्ती साठी सेवा संपेपर्यंत सोबत, दोन लेकरांना डी दहावी बारावी पुरत्या रजा नाही,प्रभार नियमांनी पण पदोन्नती स्वतंत्र यादी नाही, बीएड उत्तीर्ण दिनांक पहावी वीस पेक्षा जास्त जण फुलंब्री आधी एलसीडी अन्य तालुक्यांत झाल्याने सिनियरिटीत पुढे जाताहेत म्हणजे आम्ही पुन्हा टोकालाच..आयुष्यभर ही 285दिवस रजा साठत नाहीत,नेट सेट पीएचडी ला फीस मध्ये विधवांना सवलत द्यावी, पगार निघेल अशी सोय औरंगाबाद येथे ही असेल. नोकरी संपेपर्यंत जगतील याचा काही बॉंड नाही केलेला, लेकरं अठराचे झाले की जोडीदार नंतरचे दोन वारसदार म्हणून 50%समान पेन्शन आयुष्यभर द्यायलाच हवी फक्त जोडीदार नोकरीत नव्हते तेच एकल सर्वत्र वंचित,तिसरी पिढी भोगते आहे.. दोघं दुर्दैवाने गेले तर दोन्ही लेकरं अनुकंपा त लागतात..एकलचे आमच्या सारखे ए ग्रेड पदव्युत्तर पर्यंत तरी शिक्षणसेवक सारखे कमी पगारावर का होईना पण हातांना गुणवत्ता पाहून काम देत जगवण्यासाठी आधार द्यावा.कायदे बनवताना काळानुरूप व सर
वांना विचारात घेऊन बनवले जावे, एवढीच अपेक्षा.