डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डिजिटल परिपाठ...

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

चला सोपा करूया परिपाठ



*संकल्पना व लेखक*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046

आजचे पंचांग

तारीख - १९ जानेवारी २०२३

वार- गुरूवार (Thursday )

तिथी-पौष कृ १२ शके १९४४ द्वादशी

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

सूर्योदय: सकाळी ७-०६

सूर्यास्त: सायं. ६-१२,


चंद्रोदय: पहाटे ४-२१,

चंद्रास्त: दुपारी ३-२७


Sunrise: morning 7-06 am

 Sunset: Evening  6-12,


 Moonrise: morning4.21,

 Moonset: afternoon 3.27



सुविचार

“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.”


"If failure is the first step to success, then confidence is the foundation of that success."


दिनविशेष

१९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.


special day

 1966: Indira Gandhi assumed office as Prime Minister of India.


२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.


2006: NASA's New Horizons spacecraft is launched to Pluto.


२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला


2007: Sardar Sarovar Dam power generation project was dedicated to the nation


जन्मदिवस

१७३६: जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू: २५ ऑगस्ट १८१९)


Birthday

 1736: James Watt – Scottish inventor and mechanical engineer (died: 25 August 1819)



१८९२: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१ नोव्हेंबर १९६३)


1892: C  V  Joshi – Humorist and Researcher of Pali Literature (21 November 1963)


१८९८: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक,


1898: Vishnu Sakharam ( V.  S. Khandekar) – Marathi writer, novelist, essayist and critic,


म्हण व तिचा अर्थ

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.


Proverb and its meaning

 Hasty husband bashing the knee - Hastily acting like a fool.


कोडे

रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?

उत्तर : रामा


puzzle

 Rama's parents have four children in total.  The name of the first is 25 paise.  Name of the other 50 paise.  The name of the fourth is 100 paise.  So what will be the name of the third one?

 Answer: Rama


सामान्य ज्ञान/General knowledge


1)WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?

उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.


1) What is WHO full form 

 Answer: World Health Organization.



2) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : मध्य प्रदेश


2) Which was the first state to provide mid-day meal at home?

 Answer: Madhya Pradesh



3) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?

उत्तर : अंतरा मेहता


3) Who became the first female fighter pilot in Maharashtra?

 Answer: Antara Mehta


4) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?

उत्तर : निगार जोहर


4) Who became the first woman Lieutenant General of Army in Pakistan?

 Answer: Nigar Johar


5) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?

उत्तर : राहुल देव


5) What was the name of the first Hindu pilot commissioned in Pakistan Air Force?

 Answer: Rahul Dev.


बोधकथा/Moral story.

बोका आणि कोल्हा

एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'


बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !' इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.


तात्पर्य


- दुसर्‍यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणार्‍यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचेच शहाणपण वेळेला उपयोगी पडते. एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.


The cat and the fox


 A cat and a fox were talking under a tree in the forest.  "Oh, my friend," said the fox, "perhaps if a crisis befalls us, I can get out of it by a thousand tricks, but I am worried about you."


 'Friend, I know only one trick,' said the cat.  If I miss that much, I don't know, what will happen to me!"


 The fox said, 'Friend, I am very worried about you.  Oh, I would have taught a trick or two, but these are the times that he must find out for himself.  Don't do it at the expense of someone else.  Well, I'll come.  Ramram!' 


 Just as the fox left after saying this, the hunting dog came running from behind.  As the cat can climb the tree, he quickly climbed the tree.  But none of the fox's thousand tricks availed him.  He does not run a little further in fear when the hounds catch him.


 meaning


 - He who boasts that he is wiser than another, his wisdom is of no use in time.  But the wisdom of the one he considers less wise is useful in time.  If one is good at one subject, the work that will be done by it will not be done by many inadequate subjects.


English words


Fruits    फ्रुट्स     फळे


Mango.  मॅंगो    आंबा


Watermelon     वॉटरमेलन    टरबूज


Papaya पपया.    पपई



Orange. ऑरेंज    संत्री


Guava.   ग्वावा      पेरू



Sentences


वरील फळांची नावे वापरून विद्यार्थ्यांना विविध इंग्रजी वाक्य बोलण्यास प्रेरित करावे


For example

I like mango. प्रत्येक फळाचे नाव घेऊन असे बोलता येईल.


Mango is yellow in colour.

प्रत्येक फळाच्या रंगाबद्दल बोलता येईल.


अशा पद्धतीने फळांचे रंग चव आकार ते कोणत्या ऋतूमध्ये येतात याबद्दल मुलांना बोलत करता येईल.


जिल्हातंर्गत बदली पुढील टप्पा

 ✳️ *जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया अपडेट* 

*1) बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा?* 

*2) बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*




*संजय नागे दर्यापूर 9767397707* यांच्या लेखनीतून

 

*दिनांक 18 जानेवारी 2023* 

✳️ *बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा?* 



➡️ *जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या बाबत दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून बदल्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले होते ते पुढील प्रमाणे.*


➡️ *या अगोदरच्या वेळापत्रकानुसार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या पोर्टलवर पूर्ण करणार आहे*


➡️ *दिनांक 20 जानेवारी 2023 ला बदली पोर्टलवर बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्याची यादी व पोर्टलवर आपली बदली कुठे झालेली आहे हे समजेल*


➡️ *20 जानेवारी 2023 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील.*


➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.*


➡️ *सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात*


✳️ *बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*


➡️ *बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील*


➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो*


 ➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.*दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*


➡️ *बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व रिक्त जागा  पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास दिसणार आहेत.* 


➡️ *बदली पात्र शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम न भरल्यास जिल्ह्यातील उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांना बदलीने नियुक्ती दिली जाईल*


➡️ *बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम  देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार्म सबमिट होणार नाही*


➡️ *परंतु ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळेवर सलग पाच वर्ष व अवघड क्षेत्रातच दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा अशा शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये पसंतीक्रम देता येणार नाही कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक हे शासन निर्णय 7 एप्रिल 2021 नुसार बदली पात्र ठरवता येत नाही*


➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कोणत्याही यादीमध्ये शाळांची शोधाशोध करण्याची गरज नाही.बदली पात्र  शिक्षकांच्या पोर्टलवर दिसणाऱ्या  सर्व शाळा ह्या बदली पात्र  शिक्षकांकरिता उपलब्ध  केलेल्या आहेत बदली पात्र यादी किंवा रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे*


➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये*


➡️ *या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर सर्वसाधारण क्षेत्रातील  आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त शाळा व जिल्ह्यातील रिक्त शाळाच प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे अशावेळी संभाव्य रिक्त शाळा या सर्वसाधारण क्षेत्राबरोबरच अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात*


➡️ *बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास त्यांना विस्थापित व्हावे लागेल व पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम भरावा लागेल अशा वेळी बदली पात्र टप्प्यामधील शाळांपेक्षा निश्चितच विस्थापित टप्प्यामधील शाळा ह्या आपल्या गैरसोईच्या असतील*


➡️ *सर्वसाधारण क्षेत्रातील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना संवर्ग एकच्या टप्प्यात बदली मिळाली असेलच परंतु त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल* 


➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल  त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला पती-पत्नी अंतर्गत बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल व त्यांची बदली होईल*


➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात त्यापैकी एका बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र टप्प्यांमध्ये पसंती क्रम देत असताना जर आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा सोबत बदलीने घ्यायचे असल्यास आपल्या जोडीदार शिक्षकाला शाळेवर तीन वर्ष झालेले असेल तर त्यांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊन दोघांनाही बदली पात्र टप्प्यामध्ये पसंती क्रम भरून एक युनिट चा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे*


➡️ *पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते शिक्षक विस्थापित होऊन रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर  त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ घेताना वरील बाबीचा विचार करावा*


➡️ *बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही*


➡️ *प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे* 


https://ott.mahardd.in/


*वरील लिंकला क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे*


➡️ *सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर व मित्रमंडळ फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल*


➡️ *सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही* 


*याबद्दल कोणतीही शंका असल्यास आपण मला सरळ कॉल करू शकता*

*धन्यवाद*

जिल्हातंर्गत बदली संवर्ग ३ चे अर्ज

 जिल्हातंर्गत बदली मधील संवर्ग ३ मधून अर्ज केलेल्या शिक्षकांची जिल्हा निहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.

सर्वाधिक बदली अर्ज पुणे जिल्ह्यातून दाखल झालेले असून एकूण 485 शिक्षकांनी बदली अर्ज दाखल केलेले आहेत. 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाईटला भेट देत रहा....