डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५|navopkram-scert-नवोपक्रम लेखन नमूना|

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५        

======================                                                                                                                                                

          सन २०२४-२५  मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती,  शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत. 



*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती

५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व  

अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी लिंक देण्यात येत आहे. 


नवोपक्रम नोंदणी लिंक:

  https://forms.gle/X4eqdwFMz9JFotre7  

दिलेल्या लिंकवर आपले नवोपक्रम दि.०५/११/२०२४ ते दि.२२/११/२०२४ या कालावधीत सादर करण्यात यावेत.     


 नवोपक्रम लेखन नमूना



                                                 

शिक्षकांची पदसंख्या घटणार आता विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती | teachers-jobs-sainiki-school|

 राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी केलेल्या सुधारित धोरणानुसार या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. 

सद्यस्थितीत असलेली शिक्षकांची १ हजार १४ पदे कमी होऊन ७५६ पदे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सैनिकी शाळांमध्ये सध्या रिक्त असलेल्या आणि भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती सेवाप्रवेश विषयक प्रचलित नियमांनुसार, तसेच पवित्र प्रणालीमार्फत करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



सद्यस्थितीत सैनिकी शाळांमध्ये १९९५च्या शासन निर्णयानुसार सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी दोन शिक्षक, तर २००२च्या शासन निर्णयानुसार अकरावी ते बारावीसाठी प्रति तुकडी ५.५ शिक्षक लागू आहेत. त्यानुसार सध्या सहावी ते दहावीसाठी ८२६ शिक्षक, अकरावी-बारावीसाठी १८८ शिक्षक मंजूर आहेत. मात्र, या ऐवजी आता संचमान्यतेच्या निकषांनुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व सैनिकी शाळांमध्ये सातारा सैनिकी शाळेप्रमाणे सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी १.५ शिक्षक पदे मंजूर करावी, तर अकरावी, बारावीसाठी प्रति वर्ग प्रति तुकडी दोन या प्रमाणे एकूण चार पदे मंजूर करण्यात येतील. त्यामुळे सहावी ते दहावीसाठी ६२० शिक्षक, तर अकरावी-बारावीसाठी १३६ अशी एकूण ७५६ पदे अशी रचना करण्यात येणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास प्रचलित कार्यपद्धतीनुसार सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाची मान्यता घेतली जाणार आहे.

सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत अधिक वाचा...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अंतिम केल्यावरही इतर विषयांच्या अध्यापनासाठी आवश्यकता भासल्यास विशेष शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत तीन विशेषज्ञ शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

🏮🎉🪄 *दिवाळी अभ्यास*🪄🎉🏮


*डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व ॲक्टिव्ह गुरुजी  आपणासाठी खास दिवाळी सुट्टीसाठी  घेऊन आला आहे. मोफत दिवाळी अभ्यास 🎊🎉*


🪭🎁 *इयत्ता १ ली दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/22g3lbgf

🪭🎁 *इयत्ता २ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2cpczadq

🪭🎁 *इयत्ता ३ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/28k4a442

🪭🎁 *इयत्ता ४ थी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/23xnep3g

🪭🎁 *इयत्ता ५ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2y2tabla

🪭🎁 *इयत्ता ६ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/27o9n3rn

🪭🎁 *इयत्ता ७ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/235nzptd

🪭🎁 *इयत्ता ८ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2ckalusr

🪭🎁 *इयत्ता ९ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/29cel6nv

🪭🎁 *इयत्ता १०वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/24k9xyc6

🖼️🎈🎁 *दिवाळी स्पेशल पेन्टीग👇*🎁🎈🖼️

https://tinyurl.com/299nxezb

           *संकलन*

   *प्रकाशसिंग राजपूत*

*📺 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🖥️*


*जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा...*


RTE च्या २६ हजारांहून जास्त जागा रिक्त; अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर नाही|rte-admission|

 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

यानंतरही अद्याप २६ हजार ८७० जागा रिक्त आहेत. चौथ्या प्रतीक्षा यादीनंतर प्रवेश प्रक्रिया थंडावली आहे.जागा रिक्त असूनही पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न झाल्याने पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

rte


आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविते. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार २४२ जागांसाठी दोन लाख ४२ हजार ५१६ अर्ज आले. ऑनलाइन सोडतीत ९३ हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग खुला करून देण्यात आला. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९' (RTE) नुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील निवड यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा मार्ग खुला झाला. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र जागा रिक्त असल्याने पालक अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

परंतु प्राथमिक शिक्षण विभागाने अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न कझाल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.