डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली अपडेट २०२५ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ग्रामविकास विभाग आज व्हिडिओ कॉन्फरन्स अपडेट

 बदली अपडेट २०२५ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ग्रामविकास विभाग आज व्हिडिओ कॉन्फरन्स अपडेट





 आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली बाबत महत्वपूर्ण..!

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतर जिल्हा परिषद बाबत महत्त्वपूर्ण VC आज दिनांक 23 मे रोजी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीतील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे..

 आपसी आंतर जिल्हा बदली शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेबाबत दिनांक बदल करण्यासाठी 17 मे ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती. त्यामुळे शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये बदल झाला असल्याने पुन्हा बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करावी करण्यात येतील.

 यानंतर समान करण्याच्या जागा निश्चित करून शिक्षक रिक्त पदांच्या जागा पोर्टल वर अपलोड होतील.


यानंतर संवर्ग एक व दोन ची यादी पोर्टलला अपलोड केल्या जाईल. प्रत्यक्ष समृद्ध एक करिता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. 


मात्र , यात....


महत्त्वपूर्ण मुद्दा


                     

दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यते नुसार म्हणजेच 2024-25 ने होणार असल्याने ज्या जिल्ह्यांची संच मान्यता पूर्ण झालेली असेल त्याच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल. 


 याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळविणे बंधनकारक असल्याचे VC मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले.


  दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यते नुसार म्हणजेच 2024-25 ने होणार असल्याने ज्या जिल्ह्यांची संच मान्यता पूर्ण झालेली असेल त्याच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल. 


 याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळविणे बंधनकारक असल्याचे VC मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले.

ज्या जिल्हा परिषदे कडून संच मान्यता पूर्ण झाल्याचे कळविण्यात येईल, त्याच जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया होणार आहे.


 मात्र नवीन संचमान्यतेनुसार ज्या जिल्ह्यात शिक्षकांची पद अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन न्यायालयीन प्रक्रियेमुळे आताच होणार नाही.

 या जिल्हा परिषदांची संचमान्यता पूर्ण असेल अशा जिल्हा परिषदांचा समावेश बदली पोर्टलवर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. 



या संदर्भात लवकरच ग्राम विकास विभाग स्तरावरून स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित होणार आहेत.


सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव...

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर प्रोफाइल 4 दिवसात अपडेट करावी लागणार|teacher-transfer-ottmahard-online|

सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे.

  मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.५२०६/२०२५, ५२०७/२०२५ व ५२०८/२०२५ बाबत

                       

संदर्भ :- १. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.०९.०५.२०२५ रोजीचे आदेश.


२. शासन पत्र क्र. बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४, दि.२८.०३.२०२५




उपरोक्त विषयाबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र. ५२०६/२०२५ व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०५.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. तसेच संदर्भ क्र. २ येथील शासन समक्रमांक दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक ३ येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.


२. उपरोक्त न्यायनिर्णयाद्वारे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करुन त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची सर्व मुख्यधिकारी जि. प. यांना विनंती करण्यात आलेली आहे.


प्रत माहितीस्तवः-           


१) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).


मूळ आदेश पहा...




बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक|ottmaha-teacher-transfer-timetable|

शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 




 बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 



शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2024- 25 या वर्षातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल..

Ottmaha



*बदली संवर्ग -१ :-* 

28 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 

कालावधी एकूण सात दिवस


*बदली संवर्ग २ :-*

4 मे 2025 ते 9 मे 2019 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग ३:-*

10 मे 2025 ते 15 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग 4 :-*

16 मे 2025 ते 21 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड :-*

22 मे 2025 ते 27 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*अवघड क्षेत्रातील जागा भरणे:-*

28 मे 2025 ते 31 मे 2015 

एकूण कालावधी चार दिवस 


उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे. अनेक शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रक  करिता सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात येत आहे.