Watch video now
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे महाराष्ट्रात शाळा बंद पडली आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर अवद्या विश्वामध्ये शिक्षणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण न भेटल्याने डिजिटल साधनांची कमी असल्याने गेल्या दीड वर्षात शिक्षणावर परिणाम थोडाफार झालेला दिसून येत आहे. या वर्षी 4 ऑक्टोबर पासून करोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात शाळा पाचवी ते बारावी चे वर्ग नियमित सुरू झालेले आहे. एक नवीन उत्साह विद्यार्थी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे यामध्ये पालकांचाही सहभाग वाढलेला दिसून येत आहे शिक्षण व शाळा ही सोबत असणाऱ्या गोष्टी असल्याने त्यांना वेगळे करणे शक्य होणार नाही. मुळात ऑनलाइन शिक्षण हा फक्त एक पर्याय असू शकतो परंतु संपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही यासाठी शाळा नियमित सुरू झालेल्या ह्या फारच उपयुक्त ठरणार आहे लवकरच पहिली ते चौथी चे ही वर्ग इमेज सुरू होऊन शिक्षण प्रवास सुखाचा होवो