डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षणमंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांना करोनाची लागण #varshatai Gaikwad

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.




मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. 



राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. आता वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या अनेक मंत्री, आमदारांच्या संपर्कात आल्या होत्या त्यामुळे चिंता वाढली आहे.
 

 महाराष्ट्रात कोरोना सोबत  ओमायक्रोनबाधितांचा आकडा वाढत असताना दोन दिवसांपूर्वी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. 

त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

शाळा बाबत एका आठवडभरात निर्णय होणार काय?

करोना ओमायाक्राॕन चा धोका व  संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने शाळा महाविद्यालयाबाबत परिस्थती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.', असे मा. मंत्री आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.


मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी बोलतांना ते म्हणाले , 'सद्यस्थिती गंभीर नसली तरी करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे.

 नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. मात्र पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.', असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सन्माननीय उपस्थिती म्हणून त्यांनी हजेरी लावली होती.


१५ ते १८ वयोगटातील लसीकरण असे काही होणार...

काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात. हा आठवडा गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले आहे.

15 ते 18 वयोगटातील लसीकरणातील महत्त्वाच्या बाबी #vaccination, 15 -18,

आता 15 ते 18 वयोगटातील मुलांचे होणार लसीकरण


जगात आता कोरोना नवनवीन वेरियंटने थैमान माजवले असून त्यास प्रतिबंध बसविण्यासाठी लसीकरणाचे काम जोरदार सुरु आहे. नुकतेच 15 -18 वयोगटाच्या लसीकरणाची घोषणा झाली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मुलांच्या लसीकरणाबाबतीत आपल्या  मनात अनेक प्रश्न येत असणार.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संबोधनात लशीच्या नावाचा जरी उल्लेख केलेला नाही . 



          DCGI ने लहान मुलांसाठी Covaxin लस मंजूर केली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणाही झाली आहे. लस 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांला आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणार आहे. यापेक्षा परिस्थीत खालवल्यास 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लसीकरणाचा फायदा मिळू शकतो. मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून भारत बायोटेकला ऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती  आहे.   
         येत्या 3 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे.  सध्या देशातील ऑनलाईन प्रणालीनुसार कोविन अॕपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर स्लॉट उपलब्ध होतो. सध्या मुलांच्या लसीकरणाबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अॕपवर स्लॉट बुकिंग करताना आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. अनेक मुलांकडे आधआर कार्ड नाही.
        त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्र केलं जाण्याची शक्यता आहे. देशातील अनेक लोक खेडोपाडी, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचं त्यांच्या घरातच लसीकरण करण्यात येऊ शकतं. सध्या जी मुलं शाळेत जात आहेत, त्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाऊ शकतं. यामुळे मुलं संसर्गाच्या धोक्यापासून दूर राहतील. 

लसीकरणात दोन डोसमध्ये ९० दिवस फरक -


१८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणात ९० दिवसांचं अंतर ठेवण्यात आलं होतं. मधल्या काळात ते कमी झालं. आता ३ जानेवारीपासून बालकांचं लसीकरण सुरू होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर मुलांनी मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा दिली, तर त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख जवळ आली असेल आणि एक डोस घेतला, तरी त्यांना संसर्गापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. मुलांसाठी लशीची किंमत किती असेल? सध्या देशात मोफत व ठराविक रक्कम देऊन लसीकरण करण्याची पद्धत आहे. काही लोक शासनाने उभारलेल्या केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत. तर काही लोक खासगी रुग्णालयात पैसे भरून लस घेत आहेत. अशा स्थितीत मुलांसाठीही दोन्ही व्यवस्था असण्याची शक्यता आहे. बूस्टर डोस आणि प्रतिबंधात्मक लस म्हणजे काय? बूस्टर डोसवर  अद्याप विचारमंथन सुरू आहे. 25 डिसेंबरच्या संध्याकाळी देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी 'बूस्टर डोस' ऐवजी प्रतिबंधात्मक लस असा शब्द वापरला.

जन्मतारीख नाव , आडनावात बदल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.... Click here...


 आता प्रश्न असा आहे की, हे दोघे एकच की वेगळे आहेत. पंतप्रधानांच्या भाषणानंतर काहींना प्रश्न पडला होता. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हा या डोसचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या दोन्हीत नावाचा फरक आहे. लहान मुलांच्या लस आणि वृद्धांच्या बूस्टर डोस येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. लस दिल्यानंतर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे. 15 ते 18 वयोगटातील बालकांच्या लसीकरणामुळे इयत्ता 10वी-12वीचे विद्यार्थी चिंता न करता परीक्षा देऊ शकणार आहेत.

शापोआ धान्य वितरण महिला बचत गटामार्फत... #mahila bachat gut,


 करोनामुळे राज्यातील शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी   बंद असल्यामुळे शाळा स्तरावर शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देता येत नाही.त्यामुळे आहार खर्च मर्यादेमध्ये कोरडा शिधा वाटप करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.




 त्याच पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना धान्य वितरणाचे काम आता महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे महिला बचत गट आणि संस्थांना आर्थिक बळकटी मिळणार आहे.

राज्यामध्ये नागरी भागातील शाळांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये तयार आहाराचा पुरवठा महिला बचत गट व संस्थांमार्फत करण्यात येतो. शाळा बंद असल्यामुळे नागरी भागातील विद्यार्थ्यांना कोरडा शिधा सदर बचत गट संस्थांमार्फत पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 17 डिसेंबरच्या परिपत्रकात घेतला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार बचत गटांना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रति दिन प्रति विद्यार्थी आहार खर्च निर्धारित केलेल्या दरानुसार अखत्यारीतील शाळांना करायचा आहे. या निर्णयामुळे राज्यातील 48 महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 370 महिला बचत गट व संस्थांमार्फत कार्यरत असणाऱ्या चार हजार महिलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य सरकारनी घेतल्या निर्णयामुळे सुमारे 240 ते 250 कोटी रकमेचे धान्याची वस्तूची वाटप करण्याचे काम महिला बचत गट संस्थांना मिळणार आहे

करोनाच्या परिस्थितीमध्ये महिला बचत गट आणि संस्थांना मिळणारा रोजगार कमी झाला होता.


  महिला बचत गट आणि संस्थांची आर्थिक अडचणी निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या बचत गटांना आर्थिक उभारी मिळणार आहे.

सोने गुंतवणूक कितपत फायदेशीर gold investment,

 भारतात, अनेक दशकांपासून सोने हे बहुतेक लोकांसाठी गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. 

 गेल्या काही वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण परतावा दिला आहे.




तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी ही एक व्यवहार्य गुंतवणूक आहे.  किंबहुना, संशोधन असे सूचित करते की उच्च चलनवाढीच्या परिस्थितीत सोन्याने जोरदार कामगिरी केली आहे आणि चलनवाढीच्या काळातही ते मूल्य टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहे.  सोन्यामध्ये तुमची थोडीशी रक्कम गुंतवल्यास तुमच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यात अधिक सुरक्षितता जोडण्यासाठी अत्यंत आर्थिक परिस्थितींपासून बचाव म्हणून काम करू शकते.

 मालमत्ता वर्ग म्हणून त्याच्या महत्त्वासोबतच, सोने भारतीयांसाठी भावनिक प्रासंगिकता देखील ठेवते.  आपल्या अनेक परंपरांचा तो एक आदरणीय भाग आहे.  बहुतेक भारतीय विविध सण आणि इतर शुभ प्रसंगी भौतिक स्वरूपात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.  घरगुती बचत, सामाजिक मेळाव्यांचा अभाव आणि प्रवासाचा खर्च नसल्यामुळे कदाचित या महामारीमुळे सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे.


 पण सण असो वा नसो, तुमचे पैसे सोन्यात घालणे खरेच योग्य आहे का?


 उत्तर 'होय.  तथापि, तुम्ही सोने कसे खरेदी करता आणि तुम्ही ते कोणत्या उद्देशाने खरेदी करत आहात याचा विचार करणे योग्य आहे.  पण प्रथम, उच्च किंमती असूनही सोन्यात गुंतवणूक करणे योग्य का आहे यावर चर्चा करूया.


 तरलतेशिवाय, सोन्यामध्ये गुंतवणुकीचा एक मुख्य फायदा म्हणजे स्थिर परतावा.


 जानेवारी 1971 ते डिसेंबर 2019 दरम्यान, सोन्याचा वार्षिक सरासरी 10.61% परतावा होता.  2020 मध्ये, सोन्याचा वार्षिक सरासरी परतावा 24.6% होता, जो त्या वर्षीच्या विविध मालमत्तेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक परतावा होता.  एकंदरीत, असे म्हणता येईल की सोन्याने गुंतवणूकदारांना अनेक वर्षांमध्ये स्थिर परतावा दिला आहे, ज्यामुळे तो एक फायदेशीर गुंतवणूक पर्याय बनला आहे.


 सोने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास देखील मदत करते कारण त्याचा स्टॉकशी नकारात्मक संबंध आहे.  त्यामुळे, गेल्या वर्षीच्या साथीच्या परिस्थितीसारख्या आर्थिक संकटाचा बाजाराला फटका बसल्यास, शेअर बाजारातील व्यत्ययांपासून बचाव म्हणून सोने गुंतवणूकदारांच्या बचावासाठी येऊ शकते.


 केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कस्टम ड्युटीमध्ये घट झाल्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याची मागणी वाढू शकते.  नवीन नियमांनुसार, तुम्ही पूर्वी भरलेल्या 16.26% ऐवजी फक्त 14.07% सोन्यावर कर द्याल.  या घसरणीचा किंमतीवर परिणाम झाला असेल, परंतु अलीकडच्या काळात सोने खरेदी करणे अधिक आकर्षक आणि परवडणारे बनले आहे.  याव्यतिरिक्त, SEBI सोन्याच्या स्पॉट एक्स्चेंजसाठी नियामक बनल्यामुळे, भौतिक सोन्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक लोकांसाठी गुणवत्ता हमी यापुढे चिंतेचा विषय राहणार नाही.


 2022 मध्ये सोने खरेदी करण्याचे वेगवेगळे मार्ग


 तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.  तुम्ही साधारणपणे तुमच्या 5 ते 10% पैशांची सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.  पण सोन्यात गुंतवणूक करण्याचा योग्य मार्ग कोणता?


 सोन्याची नाणी, सराफा आणि दागिने खरेदी करणे ही बहुतांश गुंतवणूकदारांची लोकप्रिय निवड आहे.  तथापि, जर तुम्ही केवळ गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल, तर प्रत्यक्ष सोने खरेदी करताना दोन आव्हाने असू शकतात:


 1.   भौतिक सोन्याची सुरक्षितता


 2.  दागिन्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करताना तुमच्या गुंतवणुकीच्या खर्चात भर घालणारे उच्च मेकिंग शुल्क


 दुसरा पर्याय म्हणजे डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करणे.  मोबाइल अॅप्स आणि डिजिटल वॉलेटच्या परिचयामुळे डिजिटल सोने खरेदी करणे अत्यंत सोपे झाले आहे.  तुम्ही 1 रुपये इतकी कमी गुंतवणूक करू शकता आणि शुद्धतेच्या हमीसह 24k सोने खरेदी करू शकता.  तुम्ही डिजिटल सोने विकत घेतल्यास, तुमचे सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी, चोरीची भीती दूर करण्यासाठी विक्रेता जबाबदार आहे.


 तुम्ही काही क्लिक्समध्ये सध्याच्या बाजारभावावर रिअल-टाइममध्ये डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करू शकता.  तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या डिजिटल सोन्याच्या बदल्यात तुमच्या दारात प्रत्यक्ष सोने मिळवण्याचा पर्याय निवडू शकता.  तुमच्या पसंतीच्या कोणत्याही संप्रदायातील अनेक अॅप्सपैकी एकाद्वारे तुमच्या प्रियजनांना डिजिटल सोने भेट देणे देखील शक्य आहे.


 डिजिटल सोन्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.  तरीही, तुम्ही स्टोरेज खर्च आणि विम्यासाठी तुमच्या निवडलेल्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार मूल्याच्या २-३% पैसे द्याल.  डिजिटल सोन्यावर 3% GST देखील देय आहे, ज्याचा तुम्ही विचार करू शकता.


 अखेरीस, तुम्ही घालण्यायोग्य दागिने, नाणी किंवा डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करायचे की नाही हे तुमच्या वैयक्तिक निवडीवर आणि ध्येयांवर अवलंबून आहे.  परंतु जर तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील, तर तुमच्या बचतीचा काही भाग सोन्यात गुंतवणे आणि भविष्यात उच्च परताव्याच्या संभाव्य लाभाचा फायदा होऊ शकतो.