करोना ओमायाक्राॕन चा धोका व संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने शाळा महाविद्यालयाबाबत परिस्थती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.', असे मा. मंत्री आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी बोलतांना ते म्हणाले , 'सद्यस्थिती गंभीर नसली तरी करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे.
नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. मात्र पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.', असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सन्माननीय उपस्थिती म्हणून त्यांनी हजेरी लावली होती.
१५ ते १८ वयोगटातील लसीकरण असे काही होणार...
काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात. हा आठवडा गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा