डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हातंर्गत बदली सःवर्ग ३ मुदतवाढ व पर्याय निवडीचा अधिकार

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही  दिनांक २०.१२.२०२२ च्या वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १, २ व ३ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

 सद्य:स्थितीत टप्पा क्र.४ मधील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु आहे.


 दिनांक २०.१२.२०२२ वेळापत्रकानुसार सध्या टप्पा क्र.४ मधील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना ऑनलाईन बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दिनांक १०.१.२०२३ ते १४.१.२०२३ अशी देण्यात आली होती.

तथापि, दिनांक २०.१२.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये नमूद केल्यानुसार बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना ऑनलाईन बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दिनांक १०.१.२०२३ ते १५.१.२०२३ अशी करण्यात आलेली आहे.






New Bgauss d15 I #ev,

 मित्रांनो भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची नवीन क्रांती झालेली दिसून येत आहे.

 या गाड्या New Bgauss d15 i तुमच्या खिशाला या महागाईमध्ये रिकामा होण्यापासून वाचवू शकतात व याच बरोबर निसर्गाची होणारी हानी सुद्धा रोखू शकतात .



गेल्या काही दिवसापासून आपण मोठ्या शहरांमध्ये हवेचा घसरत चाललेला स्तर पाहत आहोत, ज्याच्यामध्ये  हवेचा इंडेक्स जो आहे तो खूप खालावलेला दिसून येत आहे .

ही बाब आपल्या भविष्यासाठी फारच चिंतेची बनत चाललेली आहे. आजच्या युगामध्ये New Bgauss d15 I इलेक्ट्रिक वाहने ही या प्रदूषण समस्येवर फार मोठा इलाज म्हणता येणार आहे .

आज मित्रांनो तुमच्यासाठी ग्रामीण भागात नोकरी करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आर आर केबल या कंपनीने तयार केलेली बिग बॉस ही मोपेड घेऊन आलेलो आहे संपूर्ण व्हिडिओ पहा माहिती आवडल्यास चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती

 राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आऊसाहेब...जिजाऊ यांच्यावरील एक काव्यरचना आपणासमोर व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.

 काव्य लेखन 

प्रकाशसिंग राजपूत 

स्वर 

अमोल वंजारी



महागाई भत्ता वाढला....


 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज राज्य शासनाने ४%  महागाई भत्ता मध्ये वाढ केलेली असून एक जुलै 2022 पासून ही वाढ लागू करण्यात आलेली असून  त्याची सहा महिन्याची थकबाकी व चालू महिन्याचा महागाई भत्ता हा जानेवारीच्या वेतनामध्ये अदा करण्यात येणार आहे.

 सदरील महागाई भत्ता हा रोखीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे तरी खालील व्हिडिओमध्ये आपणास याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यास मिळेल माहिती आवडल्यास या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे व  आपणांस नवीन नवीन अपडेट मिळत राहील.



खंड २

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बक्षीस समितीच्या अंतर्गत सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन आता सादर झालेला आहे .

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)


*महत्त्वाचा निर्णय*


आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य वेतन सुधारणा समिती 2017 (बक्षी समिती) अहवाल खंड - 2 मान्य करण्यात आला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्री या बैठकीस उपस्थित होते

 


सुधारित वेतन स्तर दिनांक 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात येतील आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा शासन आदेश निघेल त्या महिन्याच्या एक तारखेपासून देण्याची शिफारस समितीने केली आहे, जी की मान्य करण्यात आली.

राज्य शासनाने यास मंजुरी देत याचा थेट कर्मचाऱ्यांना आता फायदा होणार आहे.

 अनेक कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये फरक जाणून आलेला होता आणि या वेतनामध्ये आलेला फरक या खंड दोन नुसार आता दूर होणार आहे.

 या शिफारशीनुसार नवीन वेतन संरचनेमध्ये हे कर्मचारी त्यांच्या वेतनाचा लाभ घेऊ शकणार आहे .नेमके कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा भेटणार आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून खंड दोन चा अहवाल पहावा



खंड २ आदेश पहाण्यासाठी